राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा : ११ हजारांहून अधिक ‘व्‍हीआयपीं’साठी ‘खास’ भेट

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अयोध्‍येतील राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्‍ज झाला आहे. राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते होणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील ११ हजारांहून अधिक व्‍हीआयपींना (अति महत्वपूर्ण व्यक्ति) आमंत्रण देण्‍यात आले आहे. ( Ram Mandir prampratistha ceremony ) रामलल्लाच्या ‘प्राण-प्रतिष्ठा’ सोहळ्यासाठी वैदिक विधी मुख्य सोहळ्याच्या एक … The post राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा : ११ हजारांहून अधिक ‘व्‍हीआयपीं’साठी ‘खास’ भेट appeared first on पुढारी.
राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा : ११ हजारांहून अधिक ‘व्‍हीआयपीं’साठी ‘खास’ भेट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : अयोध्‍येतील राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्‍ज झाला आहे. राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते होणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील ११ हजारांहून अधिक व्‍हीआयपींना (अति महत्वपूर्ण व्यक्ति) आमंत्रण देण्‍यात आले आहे. ( Ram Mandir prampratistha ceremony )
रामलल्लाच्या ‘प्राण-प्रतिष्ठा’ सोहळ्यासाठी वैदिक विधी मुख्य सोहळ्याच्या एक आठवडा आधी 16 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. यासंदर्भात श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिलेल्‍या माहितीनुसार, राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत इतर नेत्यांसह होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून हजारो संतांना निमंत्रित करण्यात आले असून निमंत्रितांमध्ये अयोध्येत राममंदिर उभारणाऱ्या मजुरांच्या कुटुंबांचाही समावेश आहे. या कालावधीत 11,000 हून अधिक पाहुणे आणि निमंत्रितांच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. ( Ram Mandir prampratistha ceremony )
आंमत्रण दिलेल्‍या व्‍हीआयपींना प्रसादासह स्मरणार्थ चिन्ह
सनातन सेवा न्यासचे संस्थापक यांचे शिष्य शिवोम मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाहुण्यांसाठी भेटवस्तूमध्ये दोन बॉक्स असतील. प्रभू रामाशी संबंधित स्‍मरणार्थ चिन्‍ह पाहुण्यांना भेट म्हणून दिले जाईल. एका बॉक्‍समध्‍ये गाईच्या तुपापासून बनवलेला बेसन लाडू आणि रामानंदी परंपरेनुसार पवित्र तुळशीचे पान असेल. तर दुसऱ्या बॉक्समध्ये मंदिराच्या पायाभरणी समारंभात मंदिराच्या गर्भगृहातून निघालेली माती, अयोध्येची माती आणि सरयू नदीचे पाणी, स्मृतिचिन्ह म्हणून मंदिराशी संबंधित एक पितळी प्लेट आणि चांदीचे नाणे आहे. हे दोन बॉक्स ठेवण्यासाठी विशेष पिशवी असून, यावर राम मंदिराचा इतिहास दर्शविला आहे.
हेही वाचा : 

राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळा : सरसंघचालक म्‍हणाले, “भारत स्‍वबळावर…”
Ram Mandir : हुपरीत अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती
राम मंदिरासाठी २४,००० किलोची घंटा; २ किमी अंतरापर्यंत घंटानाद

 
 
 
 
Latest Marathi News राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा : ११ हजारांहून अधिक ‘व्‍हीआयपीं’साठी ‘खास’ भेट Brought to You By : Bharat Live News Media.