Pune : जिल्ह्यात अनेक फार्म हाऊसचे बांधकाम बेकायदेशीर !

शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात प्रामुख्याने शहरालगतच्या मावळ, मुळशी, खेड, शिरूरसह भोर आणि वेल्हे, पानशेत, खडकवासला भागात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात फार्म हाऊसचे बांधकाम झाले आहे. हे फार्म हाऊसचे बांधकाम करण्यासाठी संबंधित प्राधिकरणाची, अधिकार्‍यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु जिल्ह्यात अनेक ठिकाणी परवानगी न घेता फार्म हाऊसचे बांधकाम झाले आहे. अशा फार्म हाऊसवर … The post Pune : जिल्ह्यात अनेक फार्म हाऊसचे बांधकाम बेकायदेशीर ! appeared first on पुढारी.

Pune : जिल्ह्यात अनेक फार्म हाऊसचे बांधकाम बेकायदेशीर !

शिवनेरी : Bharat Live News Media वृत्तसेवा :  जिल्ह्यात प्रामुख्याने शहरालगतच्या मावळ, मुळशी, खेड, शिरूरसह भोर आणि वेल्हे, पानशेत, खडकवासला भागात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात फार्म हाऊसचे बांधकाम झाले आहे. हे फार्म हाऊसचे बांधकाम करण्यासाठी संबंधित प्राधिकरणाची, अधिकार्‍यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु जिल्ह्यात अनेक ठिकाणी परवानगी न घेता फार्म हाऊसचे बांधकाम झाले आहे. अशा फार्म हाऊसवर अनेक ठिकाणी बेकायदेशीर पार्ट्याचे आयोजन केले जाते आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. जिल्हा प्रशासन, पीएमआरडीएचे मात्र याकडे सध्या दुर्लक्षच झाले आहे. जिल्ह्यात शहरालगत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात फार्म हाऊसची बांधकामे झाली आहेत. यातील बहुतांश फार्म हाऊसकडे कुठलीच परवानगी नसल्याचे समोर आले आहे. अशा ठिकाणी काही दुर्घटना घडल्यास नक्की कारवाई काय करायची असा प्रश्न निर्माण होतो. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत फार्म हाऊसवर होणाऱ्या रेव्ह पार्टी व अन्य अनेक प्रकारच्या पार्ट्या रंगत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.
पानशेत, खडकवासला परिसरातील फार्म हाऊसवर पार्ट्या
पुणे शहरापासून जवळ आणि निसर्गरम्य परिसर म्हणून पानशेत, खडकवासला धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस बांधले आहेत. गेल्या काही वर्षांत या भागातील काही पार्ट्या खूपच गाजल्या असून, अनेक वेळा पोलिसांकडून येथील फार्म हाऊसवर धाडी टाकल्या जातात.
मावळ-मुळशी फार्म हाऊसचे तालुके
पुणे-मुंबई दोन्ही शहरातील लोकांसाठी जवळचे व प्रचंड निसर्गरम्य तालुके म्हणून मावळ-मुळशी तालुक्यात मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस बांधकामे झाली आहेत. फिल्म इंडस्ट्रीतील सिनेस्टार, अनेक बडे नेते, राजकारणी, अधिकारी यांची याच मावळ-मुळशी तालुक्यात फार्म हाऊस झाले आहेत.
हेही वाचा :

IND vs AFG : मोहालीच्या थंडीची भारतीय खेळाडूंना हुडहूडी; बीसीसीआयने शेयर केला व्हिडिओ
Maratha Reservation : मराठा बांधव 20 जानेवारीपासून मुंबईत येण्यास सुरुवात होणार

Latest Marathi News Pune : जिल्ह्यात अनेक फार्म हाऊसचे बांधकाम बेकायदेशीर ! Brought to You By : Bharat Live News Media.