सोनिया गांधी, खर्गेंनी अयोध्या सोहळ्याचे निमंत्रण नाकारले

नवी दिल्ली : Bharat Live News Media वृत्तसेवा – काँग्रेस नेते राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांना अयोध्येतील राम मंदिर कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते. (Ram Mandir Inauguration)
22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होत आहे. देशभरातील विविध पक्षांचे नेते, विविध क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तिमत्त्वांना या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांना निमंत्रण देण्यात आले होते. बुधवारी जयराम रमेश यांच्याद्वारे काँग्रेसकडून अधिकृत वक्तव्य प्रकाशित करण्यात आले. भाजपकडून निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी हा कार्यक्रम केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
Latest Marathi News सोनिया गांधी, खर्गेंनी अयोध्या सोहळ्याचे निमंत्रण नाकारले Brought to You By : Bharat Live News Media.
