मी घरी बसून शेळ्या हाकणारा नेता नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आखाडा बाळापूर : पुढारी वृत्तसेवा मी घरात बसून शेळ्या हाकणारा आणि हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी करणारा नेता नसून, लोकांमध्ये जाऊन काम करणारा जनसेवक आहे. हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी करण्यापेक्षा शेतात काम करणे कधीही चांगले, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे शिवसेनेच्या मिशन ४८ शिवसंकल्प अभियान व कार्यकर्ता … The post मी घरी बसून शेळ्या हाकणारा नेता नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे appeared first on पुढारी.

मी घरी बसून शेळ्या हाकणारा नेता नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आखाडा बाळापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा मी घरात बसून शेळ्या हाकणारा आणि हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी करणारा नेता नसून, लोकांमध्ये जाऊन काम करणारा जनसेवक आहे. हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी करण्यापेक्षा शेतात काम करणे कधीही चांगले, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे शिवसेनेच्या मिशन ४८ शिवसंकल्प अभियान व कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. (Maharashtra Politics )
राज्यात शिवसेना वाचविण्यासाठी तसेच शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबविण्यासाठी आम्ही वेगळे पाऊल उचलले. आमच्यासोबत खासदार, आमदारही आले. स्वार्थासाठी वेगळी भूमिका घेतली असती, तर तुम्ही सर्व या ठिकाणी जमला असता काय? असा सवाल त्यांनी केला.राज्यातील जनतेसाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला. आतापर्यंत २ कोटी २० लाख जनतेला विविध योजनांचा लाभ झाला, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. पालकमंत्री अब्दुल सत्तार, खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर आदी यावेळी उपस्थित होते.
Maharashtra Politics : दिलेला शब्द पाळणारच

मी शब्द पाळणारा मुख्यमंत्री आहे. इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. काही राजकीय पक्षांकडून दोन समाजांमध्ये वाद पेटवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. मराठा समाजाला दिलेला शब्द मी पाळणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
Latest Marathi News मी घरी बसून शेळ्या हाकणारा नेता नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Brought to You By : Bharat Live News Media.