एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विधानसभा अध्यक्षांच्या निकालाने एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली आहे. पक्ष स्वतःची संपत्ती समजून कोणीही मनाला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही. पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नव्हे, हे भानही या निकालाने दिले आहे. लोकशाहीत राजकीय पक्षही लोकशाही पद्धतीनेच चालले पाहिजेत, पक्षाध्यक्षसुद्धा मनमानी करू शकत नाही, हे या निकालाने अधोरेखित केले आहे, … The post एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली : मुख्यमंत्री शिंदे appeared first on पुढारी.

एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : विधानसभा अध्यक्षांच्या निकालाने एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली आहे. पक्ष स्वतःची संपत्ती समजून कोणीही मनाला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही. पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नव्हे, हे भानही या निकालाने दिले आहे. लोकशाहीत राजकीय पक्षही लोकशाही पद्धतीनेच चालले पाहिजेत, पक्षाध्यक्षसुद्धा मनमानी करू शकत नाही, हे या निकालाने अधोरेखित केले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर दिली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची पताका खांद्यावर घेऊन निघालेल्या शिवसैनिकाचा हा विजय आहे. बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचे आम्हीच खरे वारसदार आहोत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अत्यंत पुरोगामी आणि राजकीय नेत्यांना जबाबदारीचे भान देणारा हा निकाल आहे. मतदारांच्या मताचा सन्मान करणारा आणि लोकशाहीत त्याचा निर्णयाधिकार अबाधित ठेवणारा हा निकाल आहे, असे मी मानतो. सत्तेसाठी विचारांची मोडतोड करून अनैसर्गिक आघाड्या करून घोर अपराध करणार्‍या नेत्यांना या निकालाने धडा दिला आहे, असेही शिंदे म्हणाले.

Latest Marathi News एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली : मुख्यमंत्री शिंदे Brought to You By : Bharat Live News Media.