हेमा मालिनी, कैलास खेरसह दिग्गज कलावंत नागपूरमधील रामटेकच्या महोत्सवात
नागपूर; Bharat Live News Media वृत्तासेवा : राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. याअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील रामटेकच्या नेहरू मैदानात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन 19 ते 23 जानेवारीदरम्यान करण्यात येणार आहे.
स्थानिक कलाकारांसह अनेक दिग्गज कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत. यात हेमा मालिनी, कैलास खेर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. दि. १९ ते २३ जानेवारीदरम्यान आयोजित या महोत्सवादरम्यान दि. १९ जानेवारी रोजी अभिनेत्री हेमा मालिनी, दि. २० जानेवारी रोजी हंसराज रघुवंशी यांचा कार्यक्रम, दि. २१ जानेवारी रोजी लोकनृत्य दि. २२ जानेवारी रोजी महानाट्य रामटेक, दि. २३ जानेवारी रोजी कैलास खेर यांचा कार्यक्रम होणार आहे.
Latest Marathi News हेमा मालिनी, कैलास खेरसह दिग्गज कलावंत नागपूरमधील रामटेकच्या महोत्सवात Brought to You By : Bharat Live News Media.