आखाडा बाळापूर: Bharat Live News Media वृत्तसेवा : मी शब्द पाळणारा मुख्यमंत्री आहे. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. काही राजकीय पक्षाकडून दोन समाजांमध्ये वाद पेटवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, मराठा समाजाला दिलेला शब्द मी पाळणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.१०) दिली. Eknath Shinde
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे शिवसेनेच्या मिशन ४८ शिवसंकल्प अभियान व कार्यकर्ता मेळाव्यास मुख्यमंत्री शिंदे यांनी संबोधित केले. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर, बाबुराव पाटील कोहळीकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. Eknath Shinde
यावेळी शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. मोदींनी ३७० कलम हटवले. तसेच राममंदिर देखील पूर्ण झाले आहे. मी शब्द देणारा मुख्यमंत्री आहे. सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये जावून काम करणारा मुख्यमंत्री आहे. म्हणूनच लोकांनी देखील मला साथ दिली. मी घरात बसून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही. लोकांमध्ये जावून काम करणारा मुख्यमंत्री आहे. हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी करण्यापेक्षा शेतात काम करणे कधीही चांगले, असा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
राज्यात शिवसेना वाचविण्यासाठी तसेच शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबविण्यासाठी वेगळे पाऊल उचलले. आमच्यासोबत खासदार, आमदार हे देखील आले. स्वार्थासाठी वेगळी भूमिका घेतली असती तर तुम्ही सर्व या ठिकाणी जमला असता काय ? असा सवाल त्यांनी केला. खरी शिवसेना तुमची-आमची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील जनतेसाठी शासन आपल्यादारी हा उपक्रम हाती घेण्यात आला. आतापर्यंत २ कोटी २० लाख जनतेला विविध योजनांचा लाभ झाला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
बाळापूर येथील सभेसाठी पक्षाच्या वतीने मोठे नियोजन करण्यात आल्याचे दिसून आले. सभेला दुपारपासूनच शिवसैनिकांची गर्दी झाली होती. ४ च्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टर आकाशात दिसताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. व्यासपीठाच्या पाठीमागे लोकसभेचा लोगो वापरण्यात आला होता. या सभेतून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात केल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा पाढा वाचला. परंतु, जिल्ह्यातील शेतकर्यांच्या प्रश्नांवर मात्र शब्दही काढला नाही. अतिवृष्टी, पिकविमा याबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलणे टाळले. त्यामुळे शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. तसेच आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा देण्याबाबतची घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. परंतु यावरही मुख्यमंत्री बोलले नसल्याने बाळापूरकरांची नाराजी झाल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा
Eknath Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना : राहुल नार्वेकर
Shiv Sena MLA Disqualification Case : अध्यक्षांच्या निर्णयाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा दावा
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आखाडा बाळापुरात
Latest Marathi News ‘ओबीसी’ला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार : एकनाथ शिंदे Brought to You By : Bharat Live News Media.