परभणी : दस्तापूरजवळ दुचाकीस्वारांना चिरडले; २ तरुणांचा जागीच मृत्यू

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या जोराच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. हा अपघात ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दस्तापूर गाव शिवराजवळ मंगळवारी (दि.९) रात्री ११ च्यादरम्यान झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी तालुक्यातील शिर्शी येथील भारत भाऊसाहेब वैद्य (वय३९), योगीराज भानूदास लवंदे (वय ४०) हे दोघेजण मोटारसायकलने (एम एच २२,ए आर ५२४१) ताडकळस … The post परभणी : दस्तापूरजवळ दुचाकीस्वारांना चिरडले; २ तरुणांचा जागीच मृत्यू appeared first on पुढारी.

परभणी : दस्तापूरजवळ दुचाकीस्वारांना चिरडले; २ तरुणांचा जागीच मृत्यू

पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा: अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या जोराच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. हा अपघात ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दस्तापूर गाव शिवराजवळ मंगळवारी (दि.९) रात्री ११ च्यादरम्यान झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी तालुक्यातील शिर्शी येथील भारत भाऊसाहेब वैद्य (वय३९), योगीराज भानूदास लवंदे (वय ४०) हे दोघेजण मोटारसायकलने (एम एच २२,ए आर ५२४१) ताडकळस सिंगणापूर रोडवरुन गावाकडे जात होते. यावेळी त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक देवून उडवले. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी ताडकळस पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कपिल शेळके, पोलिस उपनिरीक्षक नागरगोजे शिवकांत दाखल झाले. परभणी येथील सरकारी रूग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आले. पुढील तपास ताडकळस पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे शिर्शी गावावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा 

परभणी : माटेगावात सव्वा लाखांची घरफोडी
परभणी : न-हापूर येथे बैलांची वाहतूक करणारा टेंम्पो उलटला; दोन बैलांसह चालक जखमी
परभणी : सभेसाठीच्या शिल्लक रक्कमेतून घेतली रुग्णवाहिका; सेलूतील मराठा बांधवांचा उपक्रम

Latest Marathi News परभणी : दस्तापूरजवळ दुचाकीस्वारांना चिरडले; २ तरुणांचा जागीच मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.