Bhagya Dile Tu Mala : ‘भाग्य दिले तू मला’मध्ये विदिशा म्हसकरची एन्ट्री
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत राज, कावेरी आणि रत्नमालाचा नवा प्रवास, नवी सुरुवात पाहायला मिळते आहे. या नव्या प्रवासात एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. (Bhagya Dile Tu Mala) एका आश्चर्यकारक आणि नव्या वळणावर अभिनेत्री विदिशा म्हसकर हिने ‘भाग्य दिले तू मला’ या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री घेतली आहे. तिच्या नकारात्मक भूमिकांसाठी ओळखली जाणारी विदिशा आता ‘किमया’ हे सकारात्मकतेने भरलेलं पात्र साकारून प्रेक्षकांची मनं जिंकतेय. (Bhagya Dile Tu Mala)
संबंधित बातम्या –
Bade Miyan Chote Miyan : दोन अॅक्शन स्टार अक्षय- टायगरचा येतोय ‘बडे मियाँ छोटे मियाँ’
Fighter Song : “हीर आसमानी”मध्ये वैमानिकांची हृदयस्पर्शी झलक घेऊन आले दीपिका-ऋतिक
Pole Dancing Actress : क्रिती खरबंदा ते नेहा पेंडसे ‘या’ अभिनेत्री पोल डान्सिंगमध्ये माहिर
विधिशा साकारत असलेली ‘किमया’ ही एक आत्मविश्वासू, हुशार, समजूतदार, बिनधास्त व सगळ्यांना मदत करणारी असून मालिकेत ती राजची टीम लीडर आहे. ही भूमिका विदिशा नेहमीच्या नकारात्मक पात्रांपासून नक्कीच वेगळी असून तिची ही सकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. किमया म्हणून तिची कामगिरी, अभिनय प्रेक्षकांना पाहायला आवडत आहे. किमयाच्या येण्याने मालिकेत काय काय घडणार आहे हे पाहणे रंजक ठरेल.
Latest Marathi News Bhagya Dile Tu Mala : ‘भाग्य दिले तू मला’मध्ये विदिशा म्हसकरची एन्ट्री Brought to You By : Bharat Live News Media.