मुंबईतील लोकसभेच्या सहाही जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिशन ‘महाविजय २०२४’ अंतर्गत मुंबई भाजप लोकसभा निवडणूक संचालन समितीची पहिली बैठक आज (दि.१०) मुंबई भाजप कार्यालयात पार पडली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि मुंबई भाजप अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. लोकसभेच्या सहाही जागा जिंकण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. Mumbai BJP
या बैठकीदा कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा, खा. गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, खा. पूनम महाजन लोकसभा निवडणूक संचालन समितीचे संयोजक आ. अतुल भातखळकर, आ. प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपा आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. Mumbai BJP
मुंबई भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली आहे. याच अनुषंगाने मुंबई लोकसभा निवडणूक समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्षपद मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्याकडे असून आ. अतुल भातखळकर संयोजक, तर संजय उपाध्याय, आ. सुनील राणे, आ.अमित साटम आणि आ. योगेश सागर यांना सह- संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याशिवाय विविध प्रकारचे ३६ विभाग तयार करण्यात आले आहेत. त्याची जबाबदारी अंतर्गत पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे.
Mumbai BJP टिफिन बैठक
आजच्या बैठकीला सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार स्वतः च्या घरुन जेवणचा डबा घेऊन आले होते. मुख्य आढावा बैठक झाल्यानंतर मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात टिफिन बैठकही पार पडली. प्रत्येकाने आणलेले पदार्थ एकमेकांना देऊन सहभोजनाचा आनंद यावेळी घेण्यात आला.
हेही वाचा
ना मोदी, ना फडणवीस पुणे लोकसभेसाठी भाजपाचे हे नाव आहे जास्त चर्चेत
Aditya Thackeray : भाजपने ४० गद्दारांच्या साथीने ठाकरे सरकार पाडले: आदित्य ठाकरे
भाजपप्रणीत खोके सरकार रिव्हर्स गिअरमध्ये : आदित्य ठाकरे
Latest Marathi News मुंबईतील लोकसभेच्या सहाही जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार Brought to You By : Bharat Live News Media.
