नागपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालय सुरू

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : विदर्भवासियांची मुंबईवारी टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांचे नागपूर विभागीय कार्यालय ‘विजयगड बंगला येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी संवर्गातील उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी तथा नागपूर कार्यालयाचे प्रमुख म्हणून सचिन यादव हे जबाबदारी सांभाळणार आहेत. Ajit Pawar
नागपूर, अमरावती विभागातील नागरिकांची, सामाजिक संस्था, संघटनांची कामे स्थानिक स्तरावरंच मार्गी लागावीत, मुंबईपर्यंत येण्याचे त्यांचे कष्ट थांबावेत या उद्देशाने, अजित पवार यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्र्यांचे विभागीय कार्यालय सुरु केले आहे. नागरिकांच्या अडीअडचणी, समस्या, प्रश्न सोडवण्याबरोबरच, मंत्रालयाशी संबंधित त्यांची कामे तसेच कामांचा पाठपुरावा उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूर विभागीय कार्यालयामार्फत केला जाणार आहे. Ajit Pawar
हेही वाचा
Maharashtra Politics : ‘केंद्रात भाजप सत्तेत न आल्यास अजित पवार गटाचे आमदार परतणार’
‘तुमचे तुम्हाला लखलाभ, विसरा आता आम्हाला’; अजित पवार गटाचा सल्ला
प्रांताधिकार्यांच्या कार्यालयात अजित पवार गटाचा राडा
Latest Marathi News नागपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालय सुरू Brought to You By : Bharat Live News Media.
