Pune : आंबेगावातील वीटभट्टीचालक धास्तावले

पारगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. या परिसरात मंगळवारी (दि. 9) सकाळी पावसाचा शिडकावा झाला. यामुळे वीट उत्पादकांनी तातडीने तयार कच्च्या विटांवर ताडपत्र्या झाकल्या. तालुक्याच्या पूर्व भागात आता हवामान पूर्णपणे बदलले आहे. चार दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी या भागात हलकासा पाऊस पडला होता. त्यानंतर थंडी कमी होऊन ढगाळ हवामान निर्माण झाले. मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला आहे. रब्बी हंगामामधील गहू , हरभरा, कांदा ही पिके सध्या वाढीस लागली आहेत. परंतु, आता पाऊस झाल्याने या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
या परिसरात वीट कारखान्यांमध्ये कच्च्या विटा मोठ्या प्रमाणावर तयार झालेल्या आहेत. परंतु, ढगाळ हवामान निर्माण होऊन अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाल्याने वीट वीट उत्पादकांनी तयार कच्च्या विटा पावसाने भिजू नये यासाठी वीटांवर ताडपत्री, प्लॅस्टिक कागद टाकले आहेत.
Latest Marathi News Pune : आंबेगावातील वीटभट्टीचालक धास्तावले Brought to You By : Bharat Live News Media.
