चिंता वाढली ! ‘उजनी’त अवघा 11 टक्के पाणीसाठा ; जलाशय कोरडा पडणार

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : दरवर्षी मार्चअखेरपर्यंत यशवंत जलाशयात (उजनी) 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध असतो. यंदा मात्र जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात जलाशयात अवघा 11 टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाण्याची भीषणता आत्ताच तोंड वर काढू लागली आहे. पाण्याच्या या तीव्र टंचाईमुळे पाणलोट क्षेत्राच्या कडेच्या गावांसमोर तहान कशी भागवायची, हा यक्ष प्रश्न उभा आहे तर धरणावर … The post चिंता वाढली ! ‘उजनी’त अवघा 11 टक्के पाणीसाठा ; जलाशय कोरडा पडणार appeared first on पुढारी.

चिंता वाढली ! ‘उजनी’त अवघा 11 टक्के पाणीसाठा ; जलाशय कोरडा पडणार

भिगवण : Bharat Live News Media वृत्तसेवा : दरवर्षी मार्चअखेरपर्यंत यशवंत जलाशयात (उजनी) 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध असतो. यंदा मात्र जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात जलाशयात अवघा 11 टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाण्याची भीषणता आत्ताच तोंड वर काढू लागली आहे. पाण्याच्या या तीव्र टंचाईमुळे पाणलोट क्षेत्राच्या कडेच्या गावांसमोर तहान कशी भागवायची, हा यक्ष प्रश्न उभा आहे तर धरणावर अवलंबून असलेल्या शेती व मासेमारी व्यवसायावर संकट उभे राहिले आहे.
पाण्याची नीचांकी पाणी पातळी लक्षात घेता यंदा यशवंत जलाशय (उजनी) कोरडा पडतोय की काय याचीही भीती व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे 117 टीएमसी पाणीसाठा असलेले दुसर्‍या क्रमांकाचे धरण म्हणून यशवंत जलाशयाकडे पाहिले जाते. या धरणावर पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यासह शेतीसिंचन व औद्योगिकरण, मासेमारी व्यवसायही मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. या धरण निर्मितीसाठी सर्वाधिक जमीन ही दौंड व इंदापूर तालुक्यातील संपादित झालेली आहे.
धरणामुळे आर्थिक सुबत्ता नांदेल अशी आशा धरणग्रस्तांना होती. काही प्रमाणात ती सत्यात उतरली परंतु या आशेवर सातत्याने पाणी फिरल्याचा अनुभवच जास्त प्रमाणात धरणग्रस्तांच्या वाट्याला आल्याचे दिसत आहे. धरण शंभर टक्के भरले तरी दरवर्षी मार्च ते जून महिन्यात पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ या भागातील गावांवर आणि शेतकरी वर्गावर येते. अवघ्या चार महिन्यांत उजनीच्या तब्बल 53 टीएमसी उपयुक्त पाण्याचा वापर केला जातो. त्यानंतर मृतसाठ्याला हात घातला जातो. साहजिकच उन्हाळ्यात दौंड व इंदापूर, कर्जत भागात पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. हातातोंडाशी आलेली पिके जगवताना शेतकर्‍यांचा जीव मेटाकुटीला येतो.
यंदा तर उजनीत अवघा 60 टक्के एवढाच पाणीसाठा उपलब्ध झाला होता. आता तो 11 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे धरणकाठच्या भागातील शेतकरी आत्ताच धास्तावला आहे. डिसेंबर महिन्यात पाणलोट क्षेत्राला कोरड पडू लागली असेल तर पुढील सहा महिन्यांत पाण्याची काय स्थिती असेल ही धास्ती अस्वस्थ करू लागली आहे.
हजारो कुटुंबांची मासेमारी संकटात
शेतीप्रमाणेच धरणावर मासेमारी व्यवसायावर हजारो कुटुंब अवलंबून आहेत. आधीच हा व्यवसाय सरकारच्या लाल फितीत अडकून पडल्याने धोक्यात सापडला आहे. शेकडो माशांच्या जाती नामशेष झाल्या आहेत. यातून मत्स्यसंपदा व जैविक साखळी तुटून पडली आहे. त्यातच आता पाणीटंचाईची भर पडल्याने हा व्यवसाय अधिकच अडचणीत सापडण्याची शक्यता मच्छीमार व्यक्त करीत आहेत.
Latest Marathi News चिंता वाढली ! ‘उजनी’त अवघा 11 टक्के पाणीसाठा ; जलाशय कोरडा पडणार Brought to You By : Bharat Live News Media.