एकाच मैदानावर दोन सामने, डोक्याला चेंडू लागून खेळाडूचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील क्रिकेट मैदानावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. सामना खेळत असताना एका 52 वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला. एकाच मैदानावर दोन सामने सुरू असल्यामुळे हा अपघात झाला. (Mumbai Cricket News) जयेश सावला असे मृत्यू झालेल्या खेळाडूचे नाव आहे. सामन्या दरम्यान डोक्याला मागून चेंडू लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वास्तविक, सावलाला लागलेला चेंडू … The post एकाच मैदानावर दोन सामने, डोक्याला चेंडू लागून खेळाडूचा मृत्यू appeared first on पुढारी.

एकाच मैदानावर दोन सामने, डोक्याला चेंडू लागून खेळाडूचा मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मुंबईतील क्रिकेट मैदानावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. सामना खेळत असताना एका 52 वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला. एकाच मैदानावर दोन सामने सुरू असल्यामुळे हा अपघात झाला. (Mumbai Cricket News)
जयेश सावला असे मृत्यू झालेल्या खेळाडूचे नाव आहे. सामन्या दरम्यान डोक्याला मागून चेंडू लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वास्तविक, सावलाला लागलेला चेंडू हा दुसऱ्या सामन्यातील होता.
सोमवारी (दि.8) दुपारी माटुंगा येथे हा अपघात झाला. क्रिकेट मैदानावर एकाच स्पर्धेचे दोन टी-२० सामने सुरू होते. ही स्पर्धा 50 वर्षांवरील लोकांसाठी आयोजित केली होती. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, जयेश सावला दादर पारसी कॉलनी स्पोर्टिंग क्लबच्या मैदानावर फिल्डिंग करत असताना चेंडू कानामागे लागला. (Mumbai Cricket News)
रुग्णालयात घोषित केले मृत
जखमी अवस्थेत जयेश खाली कोसळला. यावेळी नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेले. यावेळी त्यांना मृत घोषित करण्यात आले. एकाच मैदानावर दोन सामने होणे सामान्य आहे. या सामन्यांमध्ये खेळाडूंना दुखापत झाल्याच्या बातम्या याआधीही आल्या आहेत, पण मृत्यूची ही कदाचित पहिलीच वेळ आहे.

Cricketer Dies In Mumbai After Being Hit By Ball From Another Matchhttps://t.co/vrz5u7AWlY
— CricketNDTV (@CricketNDTV) January 10, 2024

हेही वाचा :

Bicycles Theft : तीन अल्पवयीन मित्रांनी चोरल्या 80 सायकली; 4-70 हजारांपर्यंतच्या 63 सायकली जप्त
Nashik News : जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांना बँकांचा ‘ब्रेक’
Shiv Sena MLA Disqualification Case : अध्यक्षांच्या निर्णयाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा दावा

Latest Marathi News एकाच मैदानावर दोन सामने, डोक्याला चेंडू लागून खेळाडूचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.