इंदापुरात रेशन धान्याचा काळाबाजार; तांदळाच्या 188 गोण्या ताब्यात
इंदापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : इंदापुरात रेशनवरील धान्याचा काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एसटी महामंडळाच्या महाकार्गो वाहनातून स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात जाणारा तांदूळ इंदापूर पोलिसांनी पकडला. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी रात्री हा कारवाई करण्यात आली. शैलेश अशोक ढोले, (रा. रामदास पथ, मेन रोड, इंदापूर), गणेश होळकर (रा. सावतामाळीनगर, इंदापूर) शिवाजी पवार (रा. वडापुरी, ता. इंदापूर),अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी इंदापूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक संतोष निशिकांत अनगरे यांनी फिर्याद दिली.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील संबंधित ट्रेडिंग कंपनीच्या गोदामामधून रविवारी रात्री एसटीची महाकार्गो गाडी धान्य घेऊन कोल्हापूरच्या दिशेने निघणार होती. दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या वाहनावर छापा टाकला. त्यामध्ये रेशनचे धान्य आढळून आले. पोलिसांनी कारवाई करीत 1 लाख 69 हजार 200 रुपये किंमतीच्या तांदळाच्या 50 किलो वजनाच्या एकुण 188 गोण्या आणि 5 लाख रुपये किमतीची महा कार्गो गाडी (एम.एच. 07 सी. 7440) असा एकूण 6 लाख 69 हजार 200 रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.
हेही वाचा :
Accident news : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
दिलासादायक ! JN1 चा संसर्ग सौम्य
Latest Marathi News इंदापुरात रेशन धान्याचा काळाबाजार; तांदळाच्या 188 गोण्या ताब्यात Brought to You By : Bharat Live News Media.