जळगावात वायरमन, अमळनेरात हवालदार एसीबीच्या जाळ्यात

जळगाव – शहरातील एका व्यक्तीकडून वीज चोरी प्रकरण मिटवण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना वीज वितरण कंपनीच्या कंत्राटी वायरमनला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री लाच घेताना रंगे हात पकडले. शहरातील  53 वर्षीय तक्रारदाराने घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण केले होते.  घराला वीज मीटर बसवण्यासाठी यापूर्वीच अर्ज करूनही त्यांना मीटर देण्यात आले नव्हते. त्यांनी खांब्यावरून वीज … The post जळगावात वायरमन, अमळनेरात हवालदार एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

जळगावात वायरमन, अमळनेरात हवालदार एसीबीच्या जाळ्यात

जळगाव – शहरातील एका व्यक्तीकडून वीज चोरी प्रकरण मिटवण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना वीज वितरण कंपनीच्या कंत्राटी वायरमनला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री लाच घेताना रंगे हात पकडले.
शहरातील  53 वर्षीय तक्रारदाराने घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण केले होते.  घराला वीज मीटर बसवण्यासाठी यापूर्वीच अर्ज करूनही त्यांना मीटर देण्यात आले नव्हते. त्यांनी खांब्यावरून वीज प्रवाह घेतल्याने वीज कंपनीच्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आला. चार लाख 60 हजार रुपये दंडाची रक्कम भरली तरच वीज मीटर कनेक्शन मिळेल, असा निरोप कंत्राटी वायरमन यांच्यामार्फत देण्यात आल्यानंतर तक्रारदार यांनी कंत्राटी वायरमन यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली असता एक लाख साठ हजार रुपयांमध्ये प्रकरण मिटवण्याचे आश्वासन देत लाच मागण्यात आली व एक लाख 40 हजार रुपये लाच देण्याचे ठरल्यानंतर सापळा रचण्यात आला. लाचे तील पहिल्या टप्प्यात मंगळवारी रात्री दहा वाजता एक लाखांची लाच देण्याचे ठरले. जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे व एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, सुनील वानखेडे, बाळू मराठे, राकेश दुसाने, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे यांनी सापळा रचून कंत्राटी वायरमन प्रशांत विकास जगताप (33) यांना जळगावच्या टॉवर चौकात लाच स्वीकारताच अटक केली.
30 हजारांची लाच घेताना हवालदारासह पंटर एसीबीच्या जाळ्यात
अमळनेर पोलीस ठाण्यामध्ये कर्मचारी व त्याचा पंटर तीस हजार रुपयाची लाच घेताना धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. गौण खनिज प्रकरणी लाच पोलीस कर्मचाऱ्यांना भोवली आहे. अमळनेर शहरातील रहिवासी असलेले व गौण खनिजचा व्यवसाय करणारे तक्रारदार आहे. गौण खनिजसाठी डंपर सुरू ठेवण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच अमळनेर पोलीस ठाण्याचे हवालदार घनश्याम पवार यांनी मागितली. या प्रकरणी तक्रारदार याने धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे व सहकार्‍यांनी लाच स्वीकारताच खाजगी पंटर व घनश्याम पवार यांना अटक करण्यात आली. लाच प्रकरणी पोलीस खात्यामध्ये खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :

Vibrant Gujarat Summit 2024 | गुजरातमध्ये २ लाख कोटींची गुंतवणूक, १ लाख नोकऱ्यांची निर्मिती, अदानींची घोषणा
Lok Sabha Election 2024 | लातूर : भाजपसाठी रान मोकळे, काँग्रेसची परीक्षा
National Youth Festival : पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सजतेय नाशिकनगरी

Latest Marathi News जळगावात वायरमन, अमळनेरात हवालदार एसीबीच्या जाळ्यात Brought to You By : Bharat Live News Media.