मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आखाडा बाळापुरात

आखाडा बाळापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी आखाडा बाळापूर येथे येणार आहेत या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आखाडा बाळापूर नगरपंचायतीच्या घोषणेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Eknath Shinde)
आखाडा बाळापुर तालुका निर्मितीचा प्रश्न मागील सुमारे 40 वर्षापेक्षा अधिक काळापासून कितपत पडला आहे. तालुका संघर्ष समितीच्या वतीने कळमनुरी तालुक्याचे विभाजन करून आखाडा बाळापुर तालुका निर्मिती करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलने देखील करण्यात आली. प्रत्येक वेळी सरकारने आश्वासने देऊन आखाडा बाळापूरकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे आखाडा बाळापूर व परिसरातील नागरिकांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच आखाडा बाळापूर तालुका संघर्ष समिती व पत्रकार संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन सादर केले होते यामध्ये आखाडा बाळापूर तालुका निर्मितीची घोषणा करावी अशी मागणी करण्यात आली होती. याशिवाय आमदार संतोष बांगर यांचे नेतृत्वाखाली मुंबई येथे गेलेल्या शिष्टमंडळाला बाळापुर ग्रामपंचायतला नगरपंचायत चा दर्जा दिला जाईल अशी आश्वासन देण्यात आले होते.
मुख्यमंत्री उमरखेड व हिंगोली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. नेमके बुधवारीच सभापतींसमोर अपात्रता याचिका सुनावणीचा निकाल आहे. दुपारी चार वाजता निकाल वाचनास प्रारंभ होणार असून, याच काळात ते हिंगोलीत असणार आहेत, हे विशेष.
Latest Marathi News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आखाडा बाळापुरात Brought to You By : Bharat Live News Media.
