Accident news : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

कुरकुंभ : Bharat Live News Media वृत्तसेवा : मनमाड – बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर दौंड हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण ठार झाला. जीवन लाजरस वाहया (वय ४२ रा नगरमोरी दौंड) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. बुधवारी (दि.१०) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला असे समजते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मनमाड- बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील नगरमोरी चौकात जीवन वाहया उभा होता. यादरम्यान अहमदनगरकडे जाणा-या भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने जीवन याला जबर धडक दिली. या अपघातात जीवन याच्या शरीराचा चेंदामेंदा होऊन तो मृत्युमुखी पडला. या घटनेनंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह फरार झाला आहे. जीवन मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करत होता. जीवनच्या मागे आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
Latest Marathi News Accident news : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार Brought to You By : Bharat Live News Media.
