घटस्फोटानंतर पतीला ताबा मिळू नये म्हणून मुलाला संपवले!

पणजी; पुढारी वृत्तसेवा : घटस्फोटानंतर मुलाचा ताबा पतीला मिळू नये, यासाठी गोव्यात एका महिलेने आपल्या पोटच्या गोळ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी वेगाने तपास करून या हत्येला वाचा फोडली आणि एका स्टार्टअपची सीईओ असलेल्या सूचना सेठ नावाच्या आरोपी महिलेची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली. (Suchana Shet) सूचना ही मूळची पश्चिम बंगालची असून, बंगळूर … The post घटस्फोटानंतर पतीला ताबा मिळू नये म्हणून मुलाला संपवले! appeared first on पुढारी.

घटस्फोटानंतर पतीला ताबा मिळू नये म्हणून मुलाला संपवले!

पणजी; Bharat Live News Media वृत्तसेवा : घटस्फोटानंतर मुलाचा ताबा पतीला मिळू नये, यासाठी गोव्यात एका महिलेने आपल्या पोटच्या गोळ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी वेगाने तपास करून या हत्येला वाचा फोडली आणि एका स्टार्टअपची सीईओ असलेल्या सूचना सेठ नावाच्या आरोपी महिलेची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली. (Suchana Shet)
सूचना ही मूळची पश्चिम बंगालची असून, बंगळूर येथे तिची ‘माईंडफुल’ नावाची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी आहे. ती या कंपनीची संस्थापिका आणि सीईओ आहे. सूचना आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी 6 जानेवारी रोजी गोव्यात आली होती. कळंगुट येथे हॉटेलमध्ये राहिल्यानंतर 8 रोजी तिने बंगळूरला जाण्यासाठी टॅक्सी मागवली. साहित्य टॅक्सीत घालून निघून गेली. यानंतर तिच्या खोलीची सफाई करताना कर्मचार्‍याला तेथे रक्ताचे डाग दिसले. हॉटेल व्यवस्थापकाने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी लगेच तपासाला गती देऊन गोवेकर टॅक्सीचालक असलेल्या व्यक्तीला फोन करून टॅक्सी जवळच्या पोलिस ठाण्यात नेेण्यास सांगितले. तेथील पोलिसांनी टॅक्सीतील साहित्य तपासले आणि बॅगेत मुलाचा मृतदेह पाहून त्यांनाही धक्का बसला. तेथेच सूचनाला बेड्या ठोकण्यात आल्या. (Suchana Shet)
हेही वाचा :

PM Modi Nashik Visit : पंतप्रधानांच्या रोड शोमध्ये घडणार महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन 
Shivsena MLA Disqualification : निकालाआधी संजय राऊतांचे मोठे वक्तव्य; म्हणाले मॅच फिक्सिंग…
सीईटी नोंदणी झाली सोपी! प्रणालीमध्ये नवीन काय? वाचा सविस्तर

Latest Marathi News घटस्फोटानंतर पतीला ताबा मिळू नये म्हणून मुलाला संपवले! Brought to You By : Bharat Live News Media.