वसतिगृहात शिरून मुलींचे कपडे चोरले आणि…

यवतमाळ : आदिवासी मुलींच्या वसतिगृहात शिरून मुलींचे कपडे चोरून नेल्याचा प्रकार यवतमाळमध्ये समोर आला आहे. शुक्रवारी (दि. ५) पहाटे साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. वसतिगृहाच्या गृहपाल वर्षा तेलंगे यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, चौकीदार ओंकार बेलसरे यांनी गृहपालांना कळवले की, पहाटे साडेतीनच्या सुमारास वसतिगृहाबाहेर एक अनोळखी व्यक्ती दिसून आली. त्याला चौकीदारांनी हटकले … The post वसतिगृहात शिरून मुलींचे कपडे चोरले आणि… appeared first on पुढारी.

वसतिगृहात शिरून मुलींचे कपडे चोरले आणि…

यवतमाळ : आदिवासी मुलींच्या वसतिगृहात शिरून मुलींचे कपडे चोरून नेल्याचा प्रकार यवतमाळमध्ये समोर आला आहे. शुक्रवारी (दि. ५) पहाटे साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. वसतिगृहाच्या गृहपाल वर्षा तेलंगे यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
तक्रारीनुसार, चौकीदार ओंकार बेलसरे यांनी गृहपालांना कळवले की, पहाटे साडेतीनच्या सुमारास वसतिगृहाबाहेर एक अनोळखी व्यक्ती दिसून आली. त्याला चौकीदारांनी हटकले असता तो दुचाकीवर बसून पळून गेला. अंधारात दुचाकीचा नंबर दिसला नाही. या घटनेनंतर गृहपालांनी वसतिगृहाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दुचाकीवरून आलेली व्यक्ती वसतिगृहात फिरताना व विद्यार्थिनींचे कपडे चोरताना दिसली. गृहपालांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.
हेही वाचा : 

कांदिवलीतील जुळ्या बहिणी ठरल्या सीए टॉपर
विवाहापूर्वी मानसिक तयारी करणे का आहे गरजेचे?
स्टायलिश लूक हवाय? तर या ‘५’ केशरचना तुमच्यासाठी

Latest Marathi News वसतिगृहात शिरून मुलींचे कपडे चोरले आणि… Brought to You By : Bharat Live News Media.