प्रियांका गांधींनी वर्ध्यातून लोकसभा निवडणूक लढवावी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीत जागांची ओढाताण सुरू झालेली असतानाच आता विदर्भात ‘बिग फाईट’ पाहायला मिळणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी गांधी भूमी वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, जेणेकरून मध्य भारतात काँग्रेसला फायदा मिळेल, अशी मागणी काँग्रेसमधीलच पदाधिकार्‍यांनी दिल्लीत हाय कमांडकडे केली आहे. … The post प्रियांका गांधींनी वर्ध्यातून लोकसभा निवडणूक लढवावी appeared first on पुढारी.

प्रियांका गांधींनी वर्ध्यातून लोकसभा निवडणूक लढवावी

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीत जागांची ओढाताण सुरू झालेली असतानाच आता विदर्भात ‘बिग फाईट’ पाहायला मिळणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी गांधी भूमी वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, जेणेकरून मध्य भारतात काँग्रेसला फायदा मिळेल, अशी मागणी काँग्रेसमधीलच पदाधिकार्‍यांनी दिल्लीत हाय कमांडकडे केली आहे.
माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया, आर. एम. खान नायडू, अ‍ॅड. मजिद कुरेशी, अजहर इकबाल आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेत या मंडळींनी ही मागणी केल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसच्या ‘हम है तय्यार…’ रॅलीच्या निमित्ताने नागपुरात सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी प्रथमच एकत्रित येणार असल्याने कार्यकर्ते उत्साहात होते. त्याचवेळी राहुल गांधी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून लढू शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. आता आगामी निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसने प्रचाराचा शंखनाद नागपुरात केला, तसाच ज्येष्ठ नेत्यांनी स्वतः निवडणुकीत उतरल्यास भाजप विरोधात प्रचाराचा झंझावात विदर्भातच नव्हे, तर महाराष्ट्रात निर्माण होऊ शकेल, असा विश्वास या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.
काय आहे मागणी?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा – गोंदिया, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर तर अल्पसंख्याक विभागाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी रामटेक या राखीव लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला पुढे जावे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडचा परंपरागत किल्ला लढवावा तर अहमदनगर येथून माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे उमेदवार असल्यास प्रतिस्पर्धी उमेदवारांना चांगली टक्कर देता येईल. 12 माजी मंत्री, तगडे उमेदवार लढल्यास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण होईल. भाजपने मंत्री, खासदारांना विधानसभा निवडणुकीत उतरवले तसाच हा प्रयोग व्हावा, अशी मागणी पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने केली आहे.
Latest Marathi News प्रियांका गांधींनी वर्ध्यातून लोकसभा निवडणूक लढवावी Brought to You By : Bharat Live News Media.