जेव्हा इम्रान यांचा फोन घ्यायला नरेंद्र मोदी नकार देतात…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बालाकोट हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या दिशेने 9 क्षेपणास्त्रे रोखली असून, ती कोणत्याही क्षणी डागली जातील, असा पाकिस्तानी लष्कराकडून संदेश आल्यावर पाकिस्तानचे धाबे दणाणले. त्यांनी जगभरातील प्रभावी देशांना याची माहिती दिली. त्यांनी तुम्हीच तणाव कमी करा, असा सल्ला दिला. हादरलेल्या तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर बोलण्याचा आग्रह … The post जेव्हा इम्रान यांचा फोन घ्यायला नरेंद्र मोदी नकार देतात… appeared first on पुढारी.

जेव्हा इम्रान यांचा फोन घ्यायला नरेंद्र मोदी नकार देतात…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बालाकोट हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या दिशेने 9 क्षेपणास्त्रे रोखली असून, ती कोणत्याही क्षणी डागली जातील, असा पाकिस्तानी लष्कराकडून संदेश आल्यावर पाकिस्तानचे धाबे दणाणले. त्यांनी जगभरातील प्रभावी देशांना याची माहिती दिली. त्यांनी तुम्हीच तणाव कमी करा, असा सल्ला दिला. हादरलेल्या तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर बोलण्याचा आग्रह धरला; पण मोदी यांनी ती विनंती साफ धुडकावून लावली.
भारताचे वरिष्ठ परराष्ट्र अधिकारी व पाकिस्तानातील तत्कालीन उच्चायुक्त मनोज बिसारिया यांनी लिहिलेल्या ‘अँगर मॅनेजमेंट ः द ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान’ या पुस्तकात वरील प्रसंग नमूद करण्यात आला आहे. या पुस्तकात 26 फेब्रुवारी 2019 च्या बालाकोट हल्ल्यानंतरच्या राजकीय व पडद्यामागील घडमोडींवर प्रकाश टाकला आहे. पुलवामा येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भीषण स्फोट घडवल्यानंतर भारताने जोरदार प्रत्युत्तर देताना थेट पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर लढाऊ विमानांच्या मदतीने हल्ला चढवला. या हल्ल्याने पाकिस्तान हादरला. त्याबाबत बिसारिया यांनी म्हटले आहे की, भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने त्यांच्या परराष्ट्र सचिव तहमिना जनुआ यांना मेसेज पाठवत भारताने पाकिस्तानच्या दिशेने 9 क्षेपणास्त्रे रोखली असून, ती कोणत्याही क्षणी डागली जातील, असे स्पष्ट म्हटले होते. यानंतर जनुआ यांनी भारतावर दबाव आणण्यासाठी रशिया, ब्रिटन, अमेरिका, चीन आणि फ्रान्स या देशांशी संपर्क साधला. या देशांनी पाकिस्तानने भारताकडे चिंता व्यक्त करावी तसेच पाकिस्ताननेच तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला दिला.
मध्यस्थी मिळवण्याचा प्रयत्न सपशेल फसल्यावर तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी थेट मोदी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. बिसारिया लिहितात की, मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्त सोहेल महमूद यांचा फोन आला व त्यांनी पंतप्रधान खान हे तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर बोलू इच्छितात, असे कळवले. मी याबाबत वरती कळवले. तेथून उत्तर आले की, पंतप्रधान मोदी इतक्या उशिरा उपलब्ध होणार नाहीत. इम्रान खान यांचा काही तातडीचा संदेश असेल, तर तो त्यांनी देऊन ठेवावा.
शी जिनपिंग यांनीही तडकावले
बिसारिया यांनी लिहिले आहे की, अमेरिकेसह इतर सर्वच देशांनी पाकिस्तानला थेट मदत करण्यास नकार दिल्यावर इम्रान खान यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी संपर्क साधत त्यांना अमेरिका चीनच्या विरोधात भारताचा वापर करत असल्याने तुम्ही आम्हाला मदत करा, अशी विनंती केली. यावर जिनपिंग यांनी इम्रान खान यांना थेट सुनावले की, भूराजकीय स्थिती एवढी सोपी नसते. चीन पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहून प्रकरण क्लिष्ट करू इच्छित नाही.
Latest Marathi News जेव्हा इम्रान यांचा फोन घ्यायला नरेंद्र मोदी नकार देतात… Brought to You By : Bharat Live News Media.