मुख्यमंत्र्यांसाेबतच्‍या भेटीबाबत विधानसभा अध्‍यक्ष नार्वेकरांचा खुलासा, म्‍हणाले…

पुढारी ऑनलाईन डेस्क :  आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी ( १० जानेवारी ) निकाल देणार आहेत. या निर्णयापूर्वी विधानसभा अध्यक्ष यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी आज (दि.९) पत्रकार परिषदेत केला.  यावर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी माध्‍यमांशी बाेलताना खुलासा केला. ( … The post मुख्यमंत्र्यांसाेबतच्‍या भेटीबाबत विधानसभा अध्‍यक्ष नार्वेकरांचा खुलासा, म्‍हणाले… appeared first on पुढारी.

मुख्यमंत्र्यांसाेबतच्‍या भेटीबाबत विधानसभा अध्‍यक्ष नार्वेकरांचा खुलासा, म्‍हणाले…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :  आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी ( १० जानेवारी ) निकाल देणार आहेत. या निर्णयापूर्वी विधानसभा अध्यक्ष यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी आज (दि.९) पत्रकार परिषदेत केला.  यावर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी माध्‍यमांशी बाेलताना खुलासा केला. ( MLA Disqualification Case)
सर्व आराेप बिनबुडाचे
नार्वेकर म्हणाले की, “विधानसभा अध्यक्ष असताना मी इतरही काही कामांकरिता मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो. अशा प्रकारचे आरोप हे बिनबुडाचे आरोप आहेत. उद्याच्या निकालाला लक्ष करत हे आरोप केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक ही नियोजित हाेती. मतदार संघातील कामांसाठी मुख्यमंत्री शिंदे भेटलाे, असा खुलासा नार्वेकर यांनी केला. शिवसेनेच्या अपात्र आमदारांवर बुधवारी (दि.१०) निर्णय होईल तर राष्ट्रवादीबाबत ३० जानेवारीपर्यंत निर्णय घेतला जाईल, असेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.
आरोपींना भेटणाऱ्या न्यायमूर्तीकडून न्यायाची काय अपेक्षा ठेवणार? : उद्धव ठाकरे
विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याच्या प्रकरणावर बोलत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, न्यायमूर्तीच आरोपीला दोनवेळा भेटले. त्यामुळे आरोपींना भेटणाऱ्या न्यायमूर्तीकडून न्यायाची काय अपेक्षा ठेवणार ? असा सवाल करून लोकशाहीची हत्या होती की काय? अशी भीती ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्‍यक्‍त केली. ( MLA Disqualification Case )
 
Latest Marathi News मुख्यमंत्र्यांसाेबतच्‍या भेटीबाबत विधानसभा अध्‍यक्ष नार्वेकरांचा खुलासा, म्‍हणाले… Brought to You By : Bharat Live News Media.