फायनल सामन्यावेळी नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टी कशी असेल?
पुढारी ऑनलाइंन डेस्क : विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याला काही तासांचा अवधी उरला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवार, १९ नोव्हेंबर २०२३ रोजी अंतिम सामन्यात ( World Cup Final ) भारताचा मुकाबलाऑस्ट्रेलियाची होणार आहे.
(IND vs AUS final pitch report ) अंतिम सामन्यात कशी असेल खेळपट्टी याबाबत जाणून घेऊया….
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत नरेंद्र मोदी स्टेडियमवर चार सामने झाले. हे चारही सामने फलंदाजांसाठी फारसे अनुकूल राहिले नाही. ऑस्ट्रेलिया संघाने या मैदानावर यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक २८६ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करणार्या इंग्लंडला अपयश आले. इंग्लंडाचा डाव २५३ धावांत आटोपला.पाठलाग करणाऱ्या संघाने या मैदानावर चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. मात्र या मैदानावरील मागील सामने पाहता पाठलाग करणाऱ्या संघांला फारसा फायदा झालेला दिसत नाही. ३० एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी आणि पाठलाग करणाऱ्या संघांनी प्रत्येकी 15 सामने जिंकले आहेत. मागील दहा सामन्यांमध्ये दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघांने सहा सामने जिंकले आहेत. (IND vs AUS final pitch report)
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्या साखळी सामना झाला होता. भारताने पाकिस्तानचे १९२ धावांचे लक्ष्य सात विकेट्स राखून आणि जवळपास २० षटके बाकी असताना पूर्ण केले. IND vs AUS World Cup 2023 final pitch report
नरेंद्र मोदी स्टेडियमवरील एकदिवसीय सामन्यांची आकडेवारी
खेळलेले सामने: ३०
प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी: 15
दुसरी फलंदाजी करणारा संघ: 15
पहिल्या डावाची एकूण सरासरी: २४३
पहिल्या डावातील विजयाची सरासरी: 253
पहिल्या डावातील सर्वोच्च धावसंख्या: ३६५
सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग: 325
विश्वचषक स्पर्धेत फिरकीपटूंना मदत करणारी खेळपट्टी
नरेंद्र मोदी स्टेडियमची विकेट फिरकी गोलंदाजीला मदत करण्यासाठी ओळखली जाते. एकदिवसीय सामन्यांमध्ये गेल्या काही वर्षांतील सरासरी धावसंख्येचा दर प्रति षटक ५ धावांपेक्षा कमी आहे. तथापि, अलिकडच्या वर्षांत, विशेषत: IPL दरम्यान, ट्रॅक जलद झाला आहे आणि धावसंख्येला मदत केली आहे. 2010 मध्ये भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने स्टेडियमवरील सर्वोच्च धावसंख्या 365/2 होती. त्या दिवशी जॅक कॅलिस आणि एबी डिव्हिलियर्स या दोघांनीही शतके झळकावली होती. ( IND vs AUS final pitch report )
अहमदाबादमधील खेळपट्टीने 2023 विश्वचषकात आतापर्यंत फिरकीपटूंना मदत केली आहे. वेगवान गोलंदाजांनी फिरकी गोलंदाजांच्या (२२) तुलनेत जास्त विकेट्स (३५) घेतल्या असल्या तरी, नंतरचे गोलंदाज अतिशय किफायतशीर आहेत. फिरकीपटू एका षटकात फक्त ४.८९ धावा देत आहेत. या विकेटवर अॅडम झाम्पाने (२१ धावांत तीन बळी) इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणले तर भारताच्या कुलदीप यादवने (35 धावांत दोन विकेट) या खेळपट्टीवर फिरकीत पाकिस्तानची मधली फळी खिळखिळी केली होती.
Five match-ups, 10 game changers 😲
The destiny of the #CWC23 Final could well be decided by these epic face-offs on the field 👊
👉 https://t.co/Xb9lHaDeQs pic.twitter.com/bWYPWTfykB
— ICC (@ICC) November 18, 2023
हेही वाचा :
World Cup 2023 Final | विराट, रोहित नाही….पॅट कमिन्स म्हणतो, ‘हा’ खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी धोकादायक!
IND vs AUS Cricket World Cup final | क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! मध्य रेल्वेकडून मुंबई ते अहमदाबाद विशेष ट्रेन
World Cup Final मध्ये परफॉर्म करणार Dua Lipa, शुभमन गिल म्हणाला…
The post फायनल सामन्यावेळी नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टी कशी असेल? appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाइंन डेस्क : विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याला काही तासांचा अवधी उरला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवार, १९ नोव्हेंबर २०२३ रोजी अंतिम सामन्यात ( World Cup Final ) भारताचा मुकाबलाऑस्ट्रेलियाची होणार आहे. (IND vs AUS final pitch report ) अंतिम सामन्यात कशी असेल खेळपट्टी याबाबत जाणून घेऊया…. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत नरेंद्र मोदी स्टेडियमवर चार …
The post फायनल सामन्यावेळी नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टी कशी असेल? appeared first on पुढारी.