कोपरगावात तरुणांचा जीवघेणा चायना मांजा टाळण्याचा संकल्प

कोपरगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : जीवघेण्या चायना, नायलॉन मांजामुळे होणारी हानी टाळण्यासाठी यंदा मकर संक्रांतीचा सण पारंपरिक मांजा वापरुन पतंग उडवून साजरा करण्याचा संकल्प येथील ब्राह्मण गल्ली व कापड बाजारातील तरुणांनी केला आहे. पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या मांजाच्या वापराने पतंग उडविण्याचे आवाहन त्यांनी अन्य पतंग प्रेमींना केले आहे. मांजा बनविण्यास सोबत स्वतःची आसारी व मांजा बनविण्याचा रिळ आणल्यास हे तरुण मांजा बनवून देत आहेत.
एक पाऊल नायलॉनमुक्त मांजाकडे टाकूया..!
नायलॉन मांजामुळे होणारे अपघात टळू शकतात. ते टाळण्यासाठी एक पाऊल टाकून यापूर्वी संक्रांतीचा भयमुक्त आनंद लुटला. तो नवीन पिढीलाही कळू द्या. मांजा कसा बनवतात हे कळावे, यासाठी तरुणांनी जनजागृती सुरू केली आहे. नायलॉन मांजा टाळून पक्षांसह नागरिकांना इजा करण्यापेक्षा त्यापासून वाचवुया, असा मोलाचा संदेश हे तरुण देत आहेत.
मकर संक्रांतीपर्यंत लुटणार आनंद
माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांनी ही संकल्पना पतंग प्रेमींना करून दिली. कोपरगावमध्ये पारंपरिक पद्धतीने मांजा तयार करून, पतंग उडविण्याचा आनंद वेगळाच असतो. ब्राह्मण गल्ली, कापड बाजारातील तरुण पारंपरिक पद्धतीने मांजा बनवून, पतंग उडविण्याचा आनंद मकर संक्रांतीपर्यंत लुटणार असल्याचे ते म्हणाले.
Latest Marathi News कोपरगावात तरुणांचा जीवघेणा चायना मांजा टाळण्याचा संकल्प Brought to You By : Bharat Live News Media.
