नोकरीच्या बदल्यात जमीन, आरोपपत्रात राबडीदेवींसह मीसा भारतींचे नाव

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रेल्वेमध्ये नोकऱ्यांच्या बदल्यात जमिनीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज ( दि.९ ) पहिले आरोपपत्र दाखल केले. यामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देव, त्यांची खासदार कन्या मीसा भारती यांच्यासह यादव कुटुंबाचे निकटवर्ती सहकारी अमित कात्याल यांच्यासह काही व्यक्ती आणि कंपन्यांची नावे आहेत.
१६ जानेवारीपासून होणार सुनावणी
रेल्वेमध्ये नोकऱ्यांच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) विशेष न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी १६ जानेवारीपासून सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. जानेवारीची तारीख निश्चित केली आहे.
काँग्रेस नेतृत्त्वाखालील संयुक्त पुरोगामाी आघाडीचे २००४ ते २००९ काळातील सरकारमध्ये हा घोटाळा झाला होता. या प्रकरणी ‘ईडी’ने नोव्हेंबर २०२३ मध्ये कात्याल यांना अटक केली होती. लालू प्रसाद यादव आणि त्यांचा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना ईडीने समन्स बजावले होते; परंतु ते ईडीसमोर अद्याप हजर झालेले नाहीत.
2004 ते 2009 या कालावधीत भारतीय रेल्वेच्या विविध झोनमध्ये ग्रुप ‘डी’ पदांवर अनेकांची नियुक्ती झाली. त्या बदल्यात नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांनी आपली जमीन तत्कालीन रेल्वेमंत्री प्रसाद यांच्या कुटुंबीय व ए.के. इन्फोसिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ने दाखल केलेल्या तक्रारीनंतर दाखल झाला होता. या प्रकरणी सीबीआयने यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले आहे.
STORY | Railways land-for-jobs linked money laundering case: ED’s first charge sheet names Rabri Devi, Misa Bharti
READ: https://t.co/uLT1mimfZa
(PTI File Photo) pic.twitter.com/ei3W9T8Wuv
— Press Trust of India (@PTI_News) January 9, 2024
हेही वाचा :
Weather In India | पुढील २४ तासांत उत्तरेत थंडी तर दक्षिणेत पावसाचा अलर्ट
MLA Disqualification Case : लोकशाहीचा खून होतोय की काय?, आमदार अपात्रतेवरून उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली भीती
The post नोकरीच्या बदल्यात जमीन, आरोपपत्रात राबडीदेवींसह मीसा भारतींचे नाव appeared first on Bharat Live News Media.
