Nagar : चोंडीतून आ. रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा सुरू

कर्जत/जामखेड : पुढारी वृत्तसेवा :  आ. रोहित पवार यांच्या युवा संघर्ष पदयात्रेच्या दुसर्‍या टप्प्याला चौंडी येथून सुरूवात झाली. पुणे ते नागपूर अशा पदयात्रेच्या दुसर्‍या टप्प्याला गुरूवारपासून सुरुवात झाली. ही युवा संघर्ष यात्रा नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान धडकणार आहे. दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून … The post Nagar : चोंडीतून आ. रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा सुरू appeared first on पुढारी.

Nagar : चोंडीतून आ. रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा सुरू

कर्जत/जामखेड : पुढारी वृत्तसेवा :  आ. रोहित पवार यांच्या युवा संघर्ष पदयात्रेच्या दुसर्‍या टप्प्याला चौंडी येथून सुरूवात झाली. पुणे ते नागपूर अशा पदयात्रेच्या दुसर्‍या टप्प्याला गुरूवारपासून सुरुवात झाली. ही युवा संघर्ष यात्रा नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान धडकणार आहे. दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन झाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर विकास कामांना सत्ता बदलानंतर स्थगिती मिळाली होती. न्यायालयाने स्थगिती उठविल्यानंतर ती कामे सुरू करण्याला हिरवा कंदिल मिळाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ विकासासाठी जवळपास 7 कोटींच्या कामांचे भूमिपूजन दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत चौंडी येथे पार पडले.
चोेंडीत होणार 7 कोटींची कामे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मस्थळी संग्रहालय बांधकाम, नदीकाठच्या घाटाचे बांधकाम व सुशोभीकरण, त्याबरोबरच जन्मस्थळी दोन मोठ्या स्वागत कमानीचे काम 7 कोटी रुपयांतून होणार आहे. आ. पवार यांनी यापूर्वीही चौंडी येथे प्राथमिक शाळेच्या बांधकामासाठी 2 कोटी 3 लाख व सीना नदीवर पश्चिम घाट बांधकामासाठी 4 कोटी 99 लाख अशी कोट्यवधींची विकासकामे मंजूर करून आणलेली आहे.
हेही वाचा :

पूर्वीच्या मागासवर्गीय आयोगामध्ये आणि आताच्या आयोगामध्ये फरक : संभाजीराजे छत्रपती
विवाहापूर्वी मानसिक तयारी करणे का आहे गरजेचे?

The post Nagar : चोंडीतून आ. रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा सुरू appeared first on पुढारी.

कर्जत/जामखेड : पुढारी वृत्तसेवा :  आ. रोहित पवार यांच्या युवा संघर्ष पदयात्रेच्या दुसर्‍या टप्प्याला चौंडी येथून सुरूवात झाली. पुणे ते नागपूर अशा पदयात्रेच्या दुसर्‍या टप्प्याला गुरूवारपासून सुरुवात झाली. ही युवा संघर्ष यात्रा नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान धडकणार आहे. दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून …

The post Nagar : चोंडीतून आ. रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा सुरू appeared first on पुढारी.

Go to Source