स्वप्नील-प्राजक्ता माळीसोबत कल्ला करायला येतोय प्रसाद खांडेकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : नव्या वर्षासाठी प्रत्येकानेच काही ना काही संकल्प केलेला असतो. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी ही मराठीतील अनेक कलाकारांना एकत्र आणत नव्या वर्षात नव्या चित्रपटाचा भन्नाट संकल्प केला आहे. त्यांचा हा संकल्प एका व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय मजेशीररीत्या त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी यांच्यासह प्रसाद खांडेकर, नम्रता … The post स्वप्नील-प्राजक्ता माळीसोबत कल्ला करायला येतोय प्रसाद खांडेकर appeared first on पुढारी.

स्वप्नील-प्राजक्ता माळीसोबत कल्ला करायला येतोय प्रसाद खांडेकर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नव्या वर्षासाठी प्रत्येकानेच काही ना काही संकल्प केलेला असतो. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी ही मराठीतील अनेक कलाकारांना एकत्र आणत नव्या वर्षात नव्या चित्रपटाचा भन्नाट संकल्प केला आहे. त्यांचा हा संकल्प एका व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय मजेशीररीत्या त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी यांच्यासह प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, निखिल रत्नपारखी, सचिन गोस्वामी, चेतना भट, प्रभाकर मोरे, निखिल बने, श्याम राजपूत, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे, ऐश्वर्या बडदे हे कलाकार या व्हिडिओत दिसतायेत.
संबंधित बातम्या –

नेहा जोशीच्या ‘सापळा’ चित्रपटाचा टीझर प्रकाशित

Bigg Boss 17 : अमल मल्लिकच्या पाठिंब्याने अंकिताच्या बिग बॉसच्या प्रवासाला कलाटणी

IMDb द्वारे 2024 मधील सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या चित्रपटांची घोषणा

चित्रपटाच्या नावाची घोषणा झाली नसली तरी चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.

नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट, आयडियाज एंटरटेनमेंट, स्वर्ण पटकथा यांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या या चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर व श्री नारकर आहेत तर परितोष पेंटर, सेजल दिपक पेंटर सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद खांडेकर यांचे आहे. दिग्दर्शन प्रसाद खांडेकरचेच आहे. मंदार चोळकर यांनी गीतलेखन तर रोहन-रोहन यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

Latest Marathi News स्वप्नील-प्राजक्ता माळीसोबत कल्ला करायला येतोय प्रसाद खांडेकर Brought to You By : Bharat Live News Media.