डोंबिवलीत रस्त्याला अडथळा ठरणारी अतिक्रमणे भुईसपाट

डोंबिवली : Bharat Live News Media वृत्तसेवा : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने 10/ई प्रभागातील रस्त्यात बाधीत होणार्या बांधकामांवर निष्कासनाची कारवाई केली.
संबंधित बातम्या
देवाभाऊ, अजब तुमचं हे सरकार! तलाठी पेपरफुटी प्रकरणी रोहित पवारांची टीका
शहापुरात शिक्षण विभागाच्या दालनात भरली शाळा
अशा प्रकारे वयाचा हिशोब…; शरद पवार यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर
केडीएमसीच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या निर्देशांनुसार सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी डोंबिवली पूर्वेकडील स्वामी समर्थ चौक ते साईबाबा मंदिर या रस्त्यामध्ये बाधित होणार्या एकूण 8 दुकानी गाळ्यांच्या बांधकामांवर निष्कासनाची कारवाई केली.
ही कारवाई अनधिकृत बांधकाम विभागातील कर्मचार्यांनी पोलिस बंदोबस्तात 1 जेसीबी, 10 कामगारांच्या साह्याने ही कारवाई करण्यात आली. या निष्कासनादरम्यान नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
Latest Marathi News डोंबिवलीत रस्त्याला अडथळा ठरणारी अतिक्रमणे भुईसपाट Brought to You By : Bharat Live News Media.
