कारची ट्रकला पाठीमागून जोराची धडक; दोन पोलिस निरीक्षक ठार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : कारने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दोन दिल्ली पोलिस निरीक्षकांचा मृत्यू झाला. सोनीपतमधील राष्ट्रीय महामार्ग-44 वर प्याउ मणियारीजवळ सोमवारी रात्री ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर चालक ट्रक सोडून घटनास्थळावरून पळून गेला.
दिनेश बेनिवाल (दादनपूर गाव, बहादूरगड, झज्जर) आणि रणबीर चहल (नरवाना, जिंद) अशी मृत पोलीस निरीक्षकांची नावे आहेत. दिनेश बेनिवाल दिल्लीच्या हैदरपूर नॉर्थ वेस्ट स्पेशल सेलमध्ये तर रणधीर चहल दिल्लीच्या आदर्श नगर पोलिस स्टेशनमध्ये तैनात होते. हे दोघेही रात्री उशिरा दिल्लीहून सोनीपतच्या दिशेने कारमधून येत होते. दिनेश बेनिवाल गाडी चालवत होते. रात्री ११.३० वाजता ते कुंडलीच्या पुढे प्याऊ मणियारी येथे आले असता, अचानक त्यांच्या समोरील ट्रकचालकाने ब्रेक लावला. त्यामुळे कार ट्रकला धडकली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही निरीक्षकांचा मृत्यू झाला आहे.
Latest Marathi News कारची ट्रकला पाठीमागून जोराची धडक; दोन पोलिस निरीक्षक ठार Brought to You By : Bharat Live News Media.
