
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. अयोध्या नगरीसह देशभरात या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X हँडलवर हरिहरन यांनी गायलेले राम भजन शेअर केले असून, त्यांच्या भजनाचे कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.९) पहाटे त्यांच्या अधिकृत X हँडलवर श्री राम भजन शेअर केले. हरिहरन यांनी गायलेल्या, मोदींनी भजनाच्या संगीताची प्रशंसा केली आणि सर्वांना भक्तीगीतांचा आनंद घेण्याचे आवाहनही केले आहे.
राम भजन सर्वांना भगवान श्री रामाच्या भक्तीत तल्लीन करेल
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, “हरिहरनजींच्या मधुर संगीताने सुशोभित केलेले हे राम भजन सर्वांना भगवान श्री रामाच्या भक्तीत तल्लीन करेल. तुम्हीही या सुंदर भजनाचा आस्वाद घ्यावा.”
हेही वाचा :
Ayodhya Ram Mandir : राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे अमेरिकेतील मंदिरांमध्ये थेट प्रक्षेपण
Ayodhya Ram Mandir Inauguration : राम मंदिराच्या उभारणीत मराठी अभियंत्याकडे मोठी जबाबदारी
Ram Mandir : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा, निमंत्रण पत्रिका वाटपास प्रारंभ
Latest Marathi News “राम भजन सर्वांना..” : PM मोदींनी केले हरिहरन यांच्या भजनाचे कौतुक Brought to You By : Bharat Live News Media.
