जर्मनीला दोनवेळा विश्वविजेता बनवणाऱ्या बेकेनबॉअर यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वातून आणखी एक दुखद बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू मारियो झागॅलो यांचे निधन झाले. या वृत्तातून सावरत असतानाच आणखी एका दिग्गज फुटबॉलपटूचे निधन झाले आहे. (Franz Beckenbauer Death) जर्मनीचे दिग्गज फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक फ्रांझ बेकेनबॉअर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास … The post जर्मनीला दोनवेळा विश्वविजेता बनवणाऱ्या बेकेनबॉअर यांचे निधन appeared first on पुढारी.

जर्मनीला दोनवेळा विश्वविजेता बनवणाऱ्या बेकेनबॉअर यांचे निधन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वातून आणखी एक दुखद बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू मारियो झागॅलो यांचे निधन झाले. या वृत्तातून सावरत असतानाच आणखी एका दिग्गज फुटबॉलपटूचे निधन झाले आहे. (Franz Beckenbauer Death)
जर्मनीचे दिग्गज फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक फ्रांझ बेकेनबॉअर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कुटुंबीयांनी याला दुजोरा दिला आहे. जर्मन वृत्तसंस्था डीपीएला दिलेल्या निवेदनात कुटुंबाने म्हटले आहे की, “फ्रांझ बेकनबाऊर यांचे काल, रविवारी (दि.7) निधन झाले. ही घोषणा करताना आम्हाला अतिशय दुःख होत आहे. फ्रांझ बेकेनबॉअर यांनी जर्मनीला दोनदा विश्वविजेते बनवले होते.
फ्रांझ बेकेनबॉअर यांना आपल्या खेळण्याच्या शैलीमुळे आणि कर्णधारपदाच्या क्षमतेमुळे ‘डेर कैजर’ (Der Kaiser) हे टोपणनाव देण्यात आले होते. हा एक जर्मन भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ सम्राट किंवा राजा असा होतो. बेकनबॉअर हे संघात सफाई कर्मचाऱ्याची भूमिका बजावत असे. त्याचा जर्मन संघातील प्रवास हा सफाई कर्मचारी ते संघ व्यवस्थापक असा होता. त्यांचा हा प्रवास खेळाबद्दलचे प्रेम आणि उत्कटता दर्शवतो. (Franz Beckenbauer Death)
जर्मन फुटबॉलचे ‘आयकॉन’
फ्रांझ बेकनबॉअर यांच्याकडे जर्मन फुटबॉलचे आयकॉन म्हणून पाहिले जाते. त्यांनी पश्चिम जर्मनीसाठी आपल्या कारकिर्दीत 104 सामने खेळले. यासह 1974 साली झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत त्यांनी जर्मनी दुसऱ्यांदा जगज्जेते बनवले. यानंतर बेकेनबॉअर यांनी 1984 साली फुटबॉल मधून निवृत्ती जाहीर केली. परंतु त्याच वर्षी त्यांना जर्मनीच्या संघ व्यवस्थापक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. यानंतर 1990 साली इटलीमध्ये झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीने तिसऱ्यांदा विश्वचषक पटकावला. यावेळी बेकेनबॉअर हे असे व्यक्ती होते की ज्यांनी खेळाडू आणि संघ व्यवस्थापक म्हणून फुटबॉल विश्वचषक पटकावला. त्यांच्यासह ब्राझीलचे मारियो झगालो आणि फ्रान्सचे डिडिएर डेशॅम्प्स यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
1964 मध्ये केले पदार्पण
फ्रान्झ बेकेनबॉअर यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. 1964 मध्ये जर्मनीतील द्वितीय विभागीय रीजनल लिगमध्ये त्यांनी पदार्पण केले. यानंतर त्यांनी क्लब फुटबॉलमध्ये बायर्न म्युनिचसाठी 584 सामने खेळले. पुढे ते चार हंगामांसाठी ते न्यूयॉर्क कॉसमॉसकडून खेळले. यामध्ये त्यांनी 105 सामने खेळले. 1980 मध्ये ते हॅम्बर्गर संघात सामील झाला. त्यांनी जर्मनीतील दिग्गज क्लब बायर्न म्युनिचसह तीन वेळा युरोपियन कप जिंकला. त्यांनी खेळाडू म्हणून चार वेळा आणि संघ व्यवस्थापक म्हणून बुंडेस्लिगा जिंकला. 1996 मध्ये, बेकनबॉअरने बायर्नला UEFA कप जिंकून दिला.

Rest in peace, Franz Beckenbauer.
One of the best players this sport has seen and a natural leader. He will be deeply missed by us all. #RIP #Beckenbauer #DFBTeam
📸 Getty Images/Imago pic.twitter.com/qIxX8EJgFU
— Germany (@DFB_Team_EN) January 8, 2024

हेही वाचा :

India-Maldives row | पर्यटनाला फटका बसताच मालदीव टूरिझम इंडस्ट्रीला आली जाग, मंत्र्यांना फटकारले
मुखोपाध्याय यांनी दोन मोबदले घेतले कसे?; रजा घेऊन विदेश दौराॉ
चुकीला माफी नाही…अर्धांगिनीचा वाढदिवस विसरल्यास ‘येथे’ नवरोबांना हाेताे थेट कारावास!

Latest Marathi News जर्मनीला दोनवेळा विश्वविजेता बनवणाऱ्या बेकेनबॉअर यांचे निधन Brought to You By : Bharat Live News Media.