अर्धांगिनीचा वाढदिवस विसरल्यास हाेताे कारावास!

अ‍ॅपिया-सामोआ : पत्नीसाठी काही पण, अशी अनेक नवरोबांची गत असते तर काहींनी ते अगदी मनापासून स्वीकारलेले देखील असते. जिच्याशिवाय आपले पानही हलू शकत नाही, अशा अर्धांगिनीचे महत्त्व जवळपास अनन्यसाधारण असेल तर त्यातही आश्चर्याचे कारण असत नाही. साहजिकच अर्धांगिनीचा वाढदिवस असेल किंवा विवाहाचा वाढदिवस, तो थाटामाटात साजरा व्हावा, ही अर्धांगिनीची अपेक्षाही गैर नव्हे; पण एखाद प्रसंगी … The post अर्धांगिनीचा वाढदिवस विसरल्यास हाेताे कारावास! appeared first on पुढारी.

अर्धांगिनीचा वाढदिवस विसरल्यास हाेताे कारावास!

अ‍ॅपिया-सामोआ : पत्नीसाठी काही पण, अशी अनेक नवरोबांची गत असते तर काहींनी ते अगदी मनापासून स्वीकारलेले देखील असते. जिच्याशिवाय आपले पानही हलू शकत नाही, अशा अर्धांगिनीचे महत्त्व जवळपास अनन्यसाधारण असेल तर त्यातही आश्चर्याचे कारण असत नाही. साहजिकच अर्धांगिनीचा वाढदिवस असेल किंवा विवाहाचा वाढदिवस, तो थाटामाटात साजरा व्हावा, ही अर्धांगिनीची अपेक्षाही गैर नव्हे; पण एखाद प्रसंगी नवरोबाला अर्धांगिनीच्या वाढदिवसाचा विसर पडला तर तो जणू अक्षम्य गुन्हाच! आणि अशाच गुन्ह्याला शिक्षा देणारा कायदा एका देशात संमत आहे. तो म्हणजे सामोआ!
सामोआ हा असा देश आहे, जेथे पत्नीचा वाढदिवस विसरण्याबाबत देशात अनोखा कायदा आहे. सामोआ हा पॅसिफिक महासागरातील पॉलिनेशियन प्रदेशातील एक देश आहे. समोआचा कायदा एका छोट्याशा चुकीसाठीही पतीला तुरुंगात पाठवू शकतो. सामोआच्या कायद्यानुसार जर एखादा पती चुकूनही आपल्या पत्नीचा वाढदिवस विसरला तर तो गुन्हा मानला जातो. त्यानंतर पत्नीने तक्रार केली तर पतीला तुरुंगातही जावे लागू शकते. सामोआमध्ये बायकोचा वाढदिवस विसरणार्‍या पतीला पहिल्यांदा वॉर्निंग दिली जाते. जर त्याने पुन्हा ती चूक आणखी एकदा केली तर अशावेळी थेट तुरुंगात धाडले जाते!
Latest Marathi News अर्धांगिनीचा वाढदिवस विसरल्यास हाेताे कारावास! Brought to You By : Bharat Live News Media.