नवी दिल्ली : डोळे हे शरीराचे महत्त्वाचे अवयव आहेत. डोळ्यांनीच आपण हे जग पाहत असतो. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. अनेक वेळा डोळ्यांसमोर अचानक अंधुकपणा येतो, चुकूनही या समस्येकडे दुर्लक्ष करू नका, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Eye Health)
अंधूक दिसत असल्यास या टीप्स अवलंबवा. जास्त वेळ लख्ख प्रकाशात काम केल्याने डोळ्यांमध्ये अंधुकपणा येतो. मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर तेजस्वी प्रकाशात काम केल्याने किंवा इतर कारणांमुळे असे होऊ शकते, परंतु ही समस्या सतत होत राहिल्यास डोळ्यांची द़ृष्टी कमी होऊ शकते. असा अंधुकपणा दूर करण्यासाठी तज्ज्ञांनी दिलेल्या या टीप्स…
आवळा आपल्या द़ृष्टीसाठी खूप फायदेशीर आहे, अशा स्थितीत द़ृष्टी वाढवण्यासाठी आवळा रस पिऊ शकतो. यामुळे डोळ्यांतील अंधुकपणा तर कमी होईलच पण द़ृष्टीही वाढेल. आहारात व्हिटॅमिन ए चे प्रमाण वाढवा. त्यासाठी दूध व दुग्धजन्य पदार्थ, गाजर, पपई, आंबा, टोमॅटो, रताळे, पालक, तांबडा भोपळा, अंडी, मासे असा आहार उपयूक्त ठरतो.
शरीरातील त्याची कमतरता भरून काढण्यासाठी ‘अ’ जीवनसत्त्वे आणि प्रथिने समृद्ध असलेले निरोगी पदार्थ आणि फळे खा. आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी, आपण दररोज दूध प्यावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी पायांना मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने अंधुक दिसण्यापासून आराम मिळतो आणि द़ृष्टीही सुधारते. (Eye Health)
Latest Marathi News डोळ्यांचा अंधुकपणा दूर करण्यासाठी ‘या’ टीप्स अवलंबवा Brought to You By : Bharat Live News Media.
डोळ्यांचा अंधुकपणा दूर करण्यासाठी ‘या’ टीप्स अवलंबवा