सासरी असलेल्या महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : विभक्त पत्नीला तिचा मूलभूत खर्च भागवण्यासाठी सासरच्या घरी राहूनही पतीकडून पोटगी मागण्याचा हक्क आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला. पतीपासून विभक्त झाल्यानंतर सासरच्या घरी राहत असलेल्या पत्नीला कुटूंब न्यायालयाने दरमहा पोटगीच्या रुपात पत्नीला १५ हजार रुपये व १० वर्षांच्या मुलासाठी १० हजार रुपये देण्याचे आदेश दिले. कुटूंबन्यायालयाच्या या आदेशा … The post सासरी असलेल्या महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार appeared first on पुढारी.

सासरी असलेल्या महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : विभक्त पत्नीला तिचा मूलभूत खर्च भागवण्यासाठी सासरच्या घरी राहूनही पतीकडून पोटगी मागण्याचा हक्क आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला.
पतीपासून विभक्त झाल्यानंतर सासरच्या घरी राहत असलेल्या पत्नीला कुटूंब न्यायालयाने दरमहा पोटगीच्या रुपात पत्नीला १५ हजार रुपये व १० वर्षांच्या मुलासाठी १० हजार रुपये देण्याचे आदेश दिले. कुटूंबन्यायालयाच्या या आदेशा विरोधात पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती गोखले यांच्या समोर सुनावणी झाली.
न्यायालयाने कुटुंब न्यायालयाच्या निर्णयाची गंभीर दखल घेत पतीपासून विभक्त झाल्यानंतरही महिला सासरच्या घरी राहते. म्हणून केवळ त्या महिलेचा पोटगीचा हक्क नाकारू शकत नाही, असे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदविताना कौटुंबिक वादातून पतीपासून दुरावा पत्करलेल्या महिलेला अद्याप तिच्या लहान मुलासाठी अन्न, औषध, कपडे आणि शैक्षणिक खर्चासाठी काही रक्कम आवश्यक आहे.
वैवाहिक संबंध संपुष्टात आल्यानंतर जोडीदार निराधार होऊ नये, त्यांचा दुरावा हा विभक्त पत्नीला शिक्षा ठरू नये, असे स्पष्ट करीत न्यायमूर्ती गोडसे यांनी कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत पतीची याचिका फेटाळून लावली.
Latest Marathi News सासरी असलेल्या महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार Brought to You By : Bharat Live News Media.