परभणी : माटेगावात सव्वा लाखांची घरफोडी
पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा: तालुक्यातील माटेगाव येथील ज्ञानदेव लिंबाजी बोबडे (वय ४३) यांच्या माटेगावातील राहत्या घरी रविवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरफोडी केली. यावेळी चोरट्यांनी घरातील साड्या, ड्रेस, शैक्षणिक साहित्य, सोन्याचांदीचे दागिने व रोख २० हजार असा सुमारे एकूण सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास केला.
चोरीच्या घटनेनंतर ज्ञानदेव बोबडे व त्यांचे कुटुंबीय जागे झाले. परंतु चोरट्यांनी खोलीला बाहेरुन कडी लावल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर शेजारील नातेवाईकांनी कडी काढली. त्यानंतर बोबडे यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक प्रदिप काकडे, पोलिस उपनिरीक्षक मिनाक्षी राखोंडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
पांगरा येथेही चोरी
दरम्यान, पांगरा लासीना येथे अरुणा गिरी यांच्या घरात चोरट्यांनी रात्री घरी कोणी नसल्याची संधी साधून २५ हजार चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. मात्र, अद्याप चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
हेही वाचा
परभणी : न-हापूर येथे बैलांची वाहतूक करणारा टेंम्पो उलटला; दोन बैलांसह चालक जखमी
परभणी : सभेसाठीच्या शिल्लक रक्कमेतून घेतली रुग्णवाहिका; सेलूतील मराठा बांधवांचा उपक्रम
परभणी : मानवत पालिकेच्या कारवाईत प्लस्टिक कॅरीबॅगचा ८३ किलो साठा जप्त, २३ हजाराचा दंड वसूल
Latest Marathi News परभणी : माटेगावात सव्वा लाखांची घरफोडी Brought to You By : Bharat Live News Media.