सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यात पावसाची हजेरी; काजू, आंबा पिकांना फटका

वैभववाडी : पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात आज (दि.८) सायंकाळी ४.३० ते ६.४५ च्या सुमारास अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. तर पावसामुळे सध्या मोहरावर असलेल्या काजू व आंबा पिकांना फटका बसण्याची शक्यता शेतकरी वर्गांतून व्यक्त होत आहेत. Sindhudurg Rain मागील दोन दिवस अधूनमधून ढगाळ वातारण होते. आज … The post सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यात पावसाची हजेरी; काजू, आंबा पिकांना फटका appeared first on पुढारी.

सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यात पावसाची हजेरी; काजू, आंबा पिकांना फटका

वैभववाडी : Bharat Live News Media वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात आज (दि.८) सायंकाळी ४.३० ते ६.४५ च्या सुमारास अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. तर पावसामुळे सध्या मोहरावर असलेल्या काजू व आंबा पिकांना फटका बसण्याची शक्यता शेतकरी वर्गांतून व्यक्त होत आहेत. Sindhudurg Rain
मागील दोन दिवस अधूनमधून ढगाळ वातारण होते. आज सायंकाळी अचानक  अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. विशेषतः सह्याद्री पट्ट्यातील करुळ, कुंभवडे, करुळ, नावळे, सडुरे या परिसरात जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावासाने अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर हवेत मात्र गारवा निर्माण झाला.  या पावसामुळे सध्या मोहराला आलेली आंबा व काजू पिकांना फटका बसणार आहे. यावर्षी थंडीची तीव्रताही दरवर्षी प्रमाणे नाही. त्यातच चार आठ दिवसांत हवामानात होणाऱ्या बदलाचा या पिकांना फटका बसत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. तसेच जिल्ह्यातील इतर भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. Sindhudurg Rain
हेही वाचा 

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर भाजपचाच अधिकार; केंद्रिय मंत्री राणे
सिंधुदुर्ग : भरधाव मोटार झाडाला धडकून अपघात; युवतीचा मृत्‍यू, २ जण जखमी
सिंधुदुर्ग : तुळस देऊळवाडी येथे भीषण आगीत घर जळून खाक

Latest Marathi News सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यात पावसाची हजेरी; काजू, आंबा पिकांना फटका Brought to You By : Bharat Live News Media.