नागपूर : रमण सायन्स सेंटर बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीने खळबळ
नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील मध्यवर्ती अशा गांधीसागर तलावाशेजारी असलेले रमण विज्ञान केंद्र बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. केंद्राच्या अधिकृत जी-मेल आयडीवर धमकीचा हा ई-मेल आला आहे. यामुळे रोज मोठया प्रमाणावर विदर्भातील विद्यार्थी, नागपूरकरांची गर्दी असलेल्या केंद्रात खळबळ निर्माण झाली आहे. Raman Science Center
याप्रकरणी केंद्राकडून तक्रारीनंतर गणेशपेठ पोलिसांनी रमण विज्ञान केंद्राची तपासणी करीत मेल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील रमण विज्ञान केंद्राला ५ जानेवारीला पहाटे साडेचार वाजता हा धमकीचा ई मेल आला. त्यानंतर यासंदर्भात केंद्राने गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. Raman Science Center
या धमकीची माहिती नागपुरातील गणेशपेठ पोलिसांनी मिळताच त्यांनी केंद्रात जाऊन कसून तपासणी केली. मात्र, त्याठिकाणी काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. नागपुरातील रमण सायन्स सेंटर आणि प्लानिटोरियम हे मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्राशी संलग्न विज्ञान केंद्र आहे. नागपूरला भेट देणारे पर्यटक महाराजबाग, अजब बंगला, फुटाळा यासोबतच रमण विज्ञान केंद्राला आवर्जून भेट देतात. देशभरातील संग्रहालय आणि विज्ञान केंद्रांना असे ई-मेल पाठविले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा
Ram Mandir Inauguration: अभिमानास्पद! अयोध्येत दुमदुमणार नागपूरचे ‘शिवगर्जना’ ढोल-ताशा पथक
Nagpur Rain : नागपूर जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
नागपूर : पोटच्या मुलाची जन्मदात्याने केली अडीच लाखांत तेलंगणात विक्री
Latest Marathi News नागपूर : रमण सायन्स सेंटर बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीने खळबळ Brought to You By : Bharat Live News Media.