नितेश राणे यांनी घेतली मोहोळ कुटुंबियांची भेट
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येनंतर आज (दि. 8) भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मोहोळ कुटुंबियांना भेट दिली. यावेळी त्यांनी या हत्याकांडाचा सखोल तपास सुरु असल्याची माहिती दिली. तसेच मोहोळ कुटुंबियांना आधार देण्यासाठी भेट दिली असल्याचे राणे यांनी सांगितले.
पुण्यातील कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा त्याच्याच साथीदाराने बेछूट गोळीबार करीत खून केला. शरद मोहोळवर सलग चार गोळ्या झाडण्यात आल्या. यातील तीन गोळ्या मोहोळला लागल्या. त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहोळच्या खुनानंतर पुण्यात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं. आज (दि. ८) भाजप आमदार नितेश राणे यांनी मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांची भेट घेतली. राणे यांनी मोहोळच्या हत्येचा सखोल तपास सुरु असल्याची माहिती कुटुंबियांना दिली.
कोण होता शरद मोहोळ?
कोथरुडमध्ये गुंड शरद मोहोळ याचा पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला. जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कातिल सिद्दीकीचा येरवड्यातील अतिसुरक्षित अंडासेलमध्ये कतिलचा मोहोळ आणि साथीदारांनी पायजम्याच्या नाडीने गळा आवाळून खून केला. कातिलच्या खुनानंतर देशभर शरद मोहोळ चर्चेत आला. गुंड संदीप मोहोळ याचा शरद मोहोळ विश्वासू साथीदार होता.
हेही वाचा
Sanjay Bansode : पालकमंत्री बनसोडे यांची आमदार गुट्टे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
Latest Marathi News नितेश राणे यांनी घेतली मोहोळ कुटुंबियांची भेट Brought to You By : Bharat Live News Media.