राज्यसभेसाठी आपच्या तिन्ही उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आम आदमी पक्षाकडून राज्यसभेसाठी तिन उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेले संजय सिंह हे देखील नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. दिल्लीतील राज्यसभेच्या तीन जागा जानेवारी अखेरीस रिक्त होत आहेत. यासाठी १९ जानेवारीला निवडणूक होत आहे. या तीन जागांसाठी आम आदमी पक्षाच्या वतीने संजय सिंह, दिल्ली महिला … The post राज्यसभेसाठी आपच्या तिन्ही उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल appeared first on पुढारी.

राज्यसभेसाठी आपच्या तिन्ही उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : आम आदमी पक्षाकडून राज्यसभेसाठी तिन उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेले संजय सिंह हे देखील नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. दिल्लीतील राज्यसभेच्या तीन जागा जानेवारी अखेरीस रिक्त होत आहेत. यासाठी १९ जानेवारीला निवडणूक होत आहे. या तीन जागांसाठी आम आदमी पक्षाच्या वतीने संजय सिंह, दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल आणि नारायण दास गुप्ता यांनी उमेदवारांनी अर्ज दाखल केले. (Aam Aadmi Party)
दिल्लीतून रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या तिन्ही जागांवर आपचे खासदार आहेत. यामध्ये संजय सिंह, नारायण दास गुप्ता आणि सुशील कुमार गुप्ता यांचा समावेश आहे. या तिघांपैकी संजय सिंह आणि नारायणदास गुप्ता यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र सुशील कुमार गुप्ता यांचा पत्ता कापण्यात आला. सुशील कुमार गुप्ता यांच्या ठिकाणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना आम आदमी पक्षाने संधी दिली आहे.
स्वाती मालीवाल यांनी राज्यसभेचे नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी आयोगाच्या अध्यक्षा म्हणून केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. त्यांच्या आठ वर्षाच्या कारकिर्दीतील अनेक महत्वाच्या घडोमोडी त्यांनी सांगितल्या, यावेळी त्या भावुक झाल्या.
हेही वाचा 

मेडिकल प्रिस्क्रिप्शन, पोस्‍टमॉर्टम रिर्पाट सुवाच्‍य हस्‍ताक्षरात लिहा : ओडिशा उच्‍च न्‍यायालयाचे निर्देश
Bangladesh Election 2024 : बांगलादेशवर शेख हसीनांचे निर्विवाद वर्चस्व, मात्र संसदेतील ‘विरोधी पक्षा’वरुन पेच!
Sanjay Raut Vs CM Shinde | …अन्यथा निधीतील घोटाळा उघडा करावा लागेल : संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Latest Marathi News राज्यसभेसाठी आपच्या तिन्ही उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल Brought to You By : Bharat Live News Media.