Pune : कडधे येथील सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर

कङूस : पुढारी वृत्तसेवा :  कडधे (ता. खेड) येथील सरपंच प्रियांका अभिजित देवदरे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. देवदरे यांच्यावर मनमानी कारभाराचा ठपका ठेवत ग्रामपंचायतच्या नऊ सदस्यापैकी सात सदस्यांनी सरपंच प्रियांका अभिजित देवदरे यांच्या विरोधात खेड तहसिलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावावर सोमवारी (दि. ८) तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अविश्वास … The post Pune : कडधे येथील सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर appeared first on पुढारी.

Pune : कडधे येथील सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर

कङूस : Bharat Live News Media वृत्तसेवा :  कडधे (ता. खेड) येथील सरपंच प्रियांका अभिजित देवदरे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. देवदरे यांच्यावर मनमानी कारभाराचा ठपका ठेवत ग्रामपंचायतच्या नऊ सदस्यापैकी सात सदस्यांनी सरपंच प्रियांका अभिजित देवदरे यांच्या विरोधात खेड तहसिलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावावर सोमवारी (दि. ८) तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अविश्वास ठरावाच्या सभेत सात विरुद्ध दोन मताने हा ठराव मंजूर केला.
सरपंच देवदरे हे मनमानी पद्धतीने ग्रामपंचायतीचा कारभार करतात, सदस्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेत नाहीत व परस्परच निर्णय घेतात, सदस्यांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही आदी मुद्द्यांचा समावेश होता. तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अविश्वास ठरावाच्या सभेत हा ठराव मंजूर केला. मंजूर केल्याचे तहसीलदार बेडसे यांनी जाहीर केले.
यावेळी तलाठी रविंद्र केंगले, उपसरपंच सचिन नाईकडे, सदस्य केतन चव्हाण, विकास मंडलिक, अर्जुन जाधव, कमल नाईकडे, रोहिणी मिरजे, प्रगती नाईकडे, जयमाला कदम आदी सदस्य उपस्थित होते.
Latest Marathi News Pune : कडधे येथील सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर Brought to You By : Bharat Live News Media.