मावळातच शिजतंय मावळ लोकसभेचं गणित

वडगाव मावळ : आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असताना माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची वाढदिवसाच्या निमित्ताने भावी खासदार म्हणून झालेली एंट्री, खासदार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अन् विजयाची व्यक्त केलेली खात्री आणि आमदार सुनील शेळके यांनी खासदार बारणे यांना केलेले चॅलेंज यामुळे मावळ लोकसभा मतदासंघाचे गणित मावळ तालुक्यातच शिजत असल्याचं दिसत आहे. पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, … The post मावळातच शिजतंय मावळ लोकसभेचं गणित appeared first on पुढारी.

मावळातच शिजतंय मावळ लोकसभेचं गणित

गणेश विनोदे

वडगाव मावळ : आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असताना माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची वाढदिवसाच्या निमित्ताने भावी खासदार म्हणून झालेली एंट्री, खासदार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अन् विजयाची व्यक्त केलेली खात्री आणि आमदार सुनील शेळके यांनी खासदार बारणे यांना केलेले चॅलेंज यामुळे मावळ लोकसभा मतदासंघाचे गणित मावळ तालुक्यातच शिजत असल्याचं दिसत आहे.
पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, उरण व पनवेल अशा मतदार संघाचा समावेश मावळ लोकसभा मतदार संघामध्ये आहे. यापैकी पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे व मावळमध्ये सुनील शेळके हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर हे भाजपचे व उरणमध्ये महेश बालदी हे भाजप संलग्न आमदार आहेत. तसेच, कर्जतमध्ये महेंद्र थोरवे हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत व गेली सलग दहा वर्ष श्रीरंग बारणे हे या मतदारसंघाचे खासदार आहेत.
बाळा भेगडे यांचीही जोरदार तयारी
मावळ लोकसभा मतदार संघावर सुरुवातीपासूनच शिवसेनेची पकड आहे, परंतु, राज्यातील सत्तानाट्यनंतर शिवसेनेत फूट झाली आणि खासदार बारणे हे शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे सद्यस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिंदे गटाच्या ताब्यात आहे. परंतु, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनीही मावळमधून खासदार होण्यासाठी जोरदार तयारी केल्याचे बोलले जात आहे.
खासदार बारणे यांना उमेदवारी मिळण्याची खात्री
शिंदे गट भाजप सोबतच सत्तेत सहभागी झाला. त्यावेळीच शिंदे गटासोबत आलेल्या खासदारांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले असल्याचे सांगितले जात असून याच जोरावर खासदार बारणे हे आगामी निवडणुकीत मीच उमेदवार असल्याचे ठामपणे सांगत आहेत. गेली दहा वर्ष मतदार संघात केलेल्या कामाच्या जोरावर मी विजयी होणारच असाही दावा खासदार बारणे यांनी केला आहे.
राष्ट्रवादीला जागा सोडण्याची मागणी
दरम्यान आमदार शेळके यांनी एका पत्रकार परिषदेतच थेट खासदार बारणे यांना आव्हान देत आधी गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडा, मावळसाठी किती निधी आणला, कोणते महत्त्वाचे प्रकल्प आणले ते सांगा व मग उमेदवारी मागा असे ओपन चॅलेंज केले. तसेच, मावळ लोकसभेची जागा महायुतीने राष्ट्रवादीला सोडावी, अशी मागणी ही आमदार शेळके यांनी केली आहे.
मतदारसंघात भेगडे यांची फ्लेसबाजी
तसेच, भाजपने राज्यातील लोकसभा प्रवास योजनेची जबाबदारी सोपवलेले माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मावळ तालुक्यात भावी खासदार म्हणून झालेली फेक्सबाजी, विविध कार्यक्रमांनी साजरा झालेला वाढदिवस यामुळे बाळा भेगडे यांचेही नाव खासदारकीच्या चर्चेत आले आहे. याशिवाय लोकसभा मतदारसंघात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने भाजपने या मतदारसंघावर दावा केला आहे. एकंदर मावळ भाजपने भेगडे यांना खासदार करण्यासाठी जोर लावला असल्याचे दिसते.
प्रत्यक्षात मात्र राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट अशी महायुतीची सत्ता असून श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तर बाळा भेगडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व सुनील शेळके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. सद्यस्थितीत हे तीनही नेते महायुतीत सहभागी असताना या तीनही नेत्यांमध्ये मावळ लोकसभेच्या जागेवरून तू तू मैं मैं सुरू आहे. त्यामुळे मावळ लोकसभेचे गणित मावळ तालुक्यातूनच शिजत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
अशीही चर्चा…
काही दिवसांपूर्वी भेगडे व शेळके यांची यांचे मनोमिलन झाल्याची चर्चा मावळ तालुक्यात रंगली होती. या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात ’आंबेगाव पॅटर्न ’ चालवण्याचीही चर्चा भाजप व राष्ट्रवादीच्या गोटात सुरू आहे. तर, गतवेळी राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्या झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ही जागा राष्ट्रवादीला सोडून पार्थ पवार यांना महायुतीच्या मदतीने खासदार करण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न सुरू असल्याची ही चर्चा आहे. तसेच, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनीच शब्द दिला असल्याने खासदार बारणे यांनाच उमेदवारी मिळणार अशीही चर्चा आहे.
Latest Marathi News मावळातच शिजतंय मावळ लोकसभेचं गणित Brought to You By : Bharat Live News Media.