Flipkart चा १,५०० कर्मचाऱ्यांना नारळ?, नोकरकपातीचे सांगितले कारण

पुढारी ऑनलाईन : वॉलमार्टच्या मालकीची ईकॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट ५ ते ७ टक्के नोकरकपात करण्याची योजना आखत आहे. या निर्णयामुळे सुमारे १,५०० कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार, ही कार्यवाही वार्षिक मुल्यमापनासह आधीच सुरू केली गेली आहे आणि ती मार्च-एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण होईल. फ्लिपकार्टमध्ये २२ हजार कर्मचारी काम करतात. यात त्यांच्या फॅशन पोर्टल Myntra … The post Flipkart चा १,५०० कर्मचाऱ्यांना नारळ?, नोकरकपातीचे सांगितले कारण appeared first on पुढारी.

Flipkart चा १,५०० कर्मचाऱ्यांना नारळ?, नोकरकपातीचे सांगितले कारण

Bharat Live News Media ऑनलाईन : वॉलमार्टच्या मालकीची ईकॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट ५ ते ७ टक्के नोकरकपात करण्याची योजना आखत आहे. या निर्णयामुळे सुमारे १,५०० कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार, ही कार्यवाही वार्षिक मुल्यमापनासह आधीच सुरू केली गेली आहे आणि ती मार्च-एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण होईल. फ्लिपकार्टमध्ये २२ हजार कर्मचारी काम करतात. यात त्यांच्या फॅशन पोर्टल Myntra साठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश नाही.
फ्लिपकार्टमधील (Flipkart) ही नोकरकपात काही नवीन नाही. कारण वार्षिक मुल्यमापनावर आधारित फ्लिपकार्ट गेल्या दोन वर्षांपासून नोकरकपात करत आहे.
या कंपनीने नवीन भरती थांबवली आहे. खर्च कमी करण्यासाठी मागील वर्षापासून त्यांनी नवीन कोणीचीही नियुक्ती केलेली नाही. याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
“ही आता वार्षिक बाब बनली आहे. मूल्यांकन चक्राचा भाग म्हणून ते (फ्लिपकार्ट) टीम्सचे रिस्ट्रक्चरिंग करत आहेत. २०२३ हे वर्ष फ्लिपकार्टसह इतर ईकॉमर्स उद्योगांसाठी चढ-उताराचे राहिले. त्यामुळे आता सुधारणा केल्या जात आहेत,” असे सूत्राच्या हवाल्याने पुढे वृत्तात म्हटले आहे.
अनेक IT कंपन्या आणि स्टार्टअप्सनी २०२१ मध्ये अधिक नोकरभरती केली होती. आता ते नोकरकपातीचा अवलंब करत आहेत. पेटीएमने सुमारे १ हजार कर्मचार्‍यांना काढून टाकले आहे आणि ही कंपनी आणखी १०-१५ टक्के नोकर्‍या कमी करण्याचा विचार करत आहे. ‘मीशो’नेदेखील (Meesho) व्यवसायाच्या पुनर्रचनेचे कारण देत नोकऱ्या कमी केल्या आहेत.
हे ही वाचा :

बाजाराचा मूड बिघडला! सेन्सेक्स ६७० अंकांनी घसरला, नेमकं कारण काय?
वेध शेअर बाजाराचा; ‘हे’ ४ स्टॉक्स जोरदार ॲक्शनमध्ये
गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Latest Marathi News Flipkart चा १,५०० कर्मचाऱ्यांना नारळ?, नोकरकपातीचे सांगितले कारण Brought to You By : Bharat Live News Media.