उत्तरेत थंडीची लाट! दिल्ली पाठोपाठ पंजाब सरकारचाही मोठा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तरेकडील बहुतांशी राज्यात थंडीची लाट आहे. पुढील काही दिवसात येथील थंडी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अनेक राज्यांत धुक्यांची घनदाट चादर पसरली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस दिल्लीसह हरियाणा, राजस्थान, पंजाब या राज्यांमध्ये थंडीचा अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीपाठोपाठ पंजाब सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे. (Cold Weather Impact) उत्तरेतील वाढत्या … The post उत्तरेत थंडीची लाट! दिल्ली पाठोपाठ पंजाब सरकारचाही मोठा निर्णय appeared first on पुढारी.

उत्तरेत थंडीची लाट! दिल्ली पाठोपाठ पंजाब सरकारचाही मोठा निर्णय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: उत्तरेकडील बहुतांशी राज्यात थंडीची लाट आहे. पुढील काही दिवसात येथील थंडी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अनेक राज्यांत धुक्यांची घनदाट चादर पसरली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस दिल्लीसह हरियाणा, राजस्थान, पंजाब या राज्यांमध्ये थंडीचा अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीपाठोपाठ पंजाब सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे. (Cold Weather Impact)
उत्तरेतील वाढत्या थंडीमुळे पंजाबमधील सर्व सरकारी, सरकारी अनुदानित आणि खाजगी शाळा आजपासून (दि.८) रविवारपर्यंत  (दि.२४) इयत्ता १० वी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय भगवंत मान सरकारने घेतला आहे. या संदर्भातील माहिती पंजाब सरकारने त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत X अकाऊंटवरून स्पष्ट केले आहे. (Cold Weather Impact)

In view of the cold weather conditions, all government, government aided and private schools in the state will remain closed from January 8-14: CMO Punjab pic.twitter.com/iWPoki5wzY
— ANI (@ANI) January 7, 2024

दिल्लीतील प्राथमिक शाळांना पुढील चार दिवस सुट्टी
उत्तरेकडील अनेक राज्यात तापमानाचाा पारा घसरला आहे. दरम्यान, थंडीमध्ये देखील प्रचंड वाढ झाली आहे. काही राज्यांत धुक्यांची घनदाट चादर पसरली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली प्रशासनाकडून पुढील ४ दिवस नर्सरी ते इयत्ता ५ वी पर्यंतच्या शांळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, सध्याच्या थंड हवामानामुळे दिल्लीतील नर्सरी ते इयत्ता ५ वी पर्यंत शाळा बंद ठेवण्यात येत आहेत. शहरातील शाळा शुक्रवार १२ जानेवारीपर्यंत बंद राहतील, असे देखील आतिशी यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. (Delhi Weather News)
हेही वाचा:

Weather Forecast | राज्यात पुन्हा अवकाळी! ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता
Delhi Weather News: उत्तरेत थंडीची लाट; दिल्लीतील प्राथमिक शाळांना पुढील ५ दिवस सुट्टी जाहीर

Latest Marathi News उत्तरेत थंडीची लाट! दिल्ली पाठोपाठ पंजाब सरकारचाही मोठा निर्णय Brought to You By : Bharat Live News Media.