Pimpari : वाकडमधून मॅफेड्रोन जप्त

पिंपरी : मॅफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून 65 ग्राम मॅफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. शनिवारी (दि. 6) रात्री बारा वाजता भुजबळ चौक, वाकड येथे ही कारवाई करण्यात आली. इम्रान चांद शेख (32, रा. कोंढवा, पुणे), समीर शहाजहान शेख (40) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार अजित कुटे … The post Pimpari : वाकडमधून मॅफेड्रोन जप्त appeared first on पुढारी.

Pimpari : वाकडमधून मॅफेड्रोन जप्त

पिंपरी : मॅफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून 65 ग्राम मॅफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. शनिवारी (दि. 6) रात्री बारा वाजता भुजबळ चौक, वाकड येथे ही कारवाई करण्यात आली. इम्रान चांद शेख (32, रा. कोंढवा, पुणे), समीर शहाजहान शेख (40) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार अजित कुटे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुजबळ चौक, वाकड येथे दोघेजण मेफेड्रॉन ड्रग्ज विक्रीसाठी आले असल्याची माहिती अंमलीपदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी भुजबळ चौकात सापळा लावला. संशयित दोघेजण दिसताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे 65 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज आढळून आले. ड्रग्जसह, एक दुचाकी, रोख रक्कम आणि तीन मोबाईल फोन असा एकूण सात लाख 52 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. नायजेरियन व्यक्तीचाही सहभाग
या मेफेड्रॉन ड्रग्ज विक्री प्रकरणात एका नायजेरियन व्यक्तीचा देखील सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी इम्रान आणि समीर या दोघांकडे आढळलेले मेफेड्रॉन ड्रग्ज त्यांनी त्यांचा नालासोपारा, मुंबई येथील साथीदार टोनी याच्याकडून आणला असल्याचे तपासात समोर आले आहे. टोनी हा नायजेरियन आहे. त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :

Suryakumar Yadav | सूर्यकुमार यादवला पाठोपाठ २ दुखापती; शस्त्रक्रिया होणार, IPL सामन्यांना मुकणार
Maratha Reservation : मराठा समाजाच्या मागासलेपणाचा सर्व्हे आयोगाने 7 दिवसांत पूर्ण करावा; राज्य सरकारचे आदेश

Latest Marathi News Pimpari : वाकडमधून मॅफेड्रोन जप्त Brought to You By : Bharat Live News Media.