पिंपरी : रेल्वेस्थानकावरील आरपीएफ जवान हरवले कुठे?

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरातून कामानिमित्त तसेच नोकरीसाठी पुण्यात तसेच लोणावळा येथे लोकलने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. कामावरून घरी परतताना अनेकांना उशीर होतो. अशावेळी शहरातील पिंपरी, चिंचवड, आकुर्डी या रेल्वे स्थानकातील आरपीएफ जवान अनुपस्थित असल्याने महिलांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न  प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे.  शहरातील पुणे- लोणावळा मार्गावर धावणार्‍या लोकल गाड्यांना सकाळी … The post पिंपरी : रेल्वेस्थानकावरील आरपीएफ जवान हरवले कुठे? appeared first on पुढारी.

पिंपरी : रेल्वेस्थानकावरील आरपीएफ जवान हरवले कुठे?

हेमांगी सूर्यवंशी

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरातून कामानिमित्त तसेच नोकरीसाठी पुण्यात तसेच लोणावळा येथे लोकलने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. कामावरून घरी परतताना अनेकांना उशीर होतो. अशावेळी शहरातील पिंपरी, चिंचवड, आकुर्डी या रेल्वे स्थानकातील आरपीएफ जवान अनुपस्थित असल्याने महिलांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न  प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे.
 शहरातील पुणे- लोणावळा मार्गावर धावणार्‍या लोकल गाड्यांना सकाळी तसेच सायंकाळी मोठी गर्दी असते.  पिंपरी-चिंचवड शहरातून पुण्यात तसेच लोणावळ्यात नोकरीला जाणार्‍यांचे प्रमाण मोठे आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण देखील मोठे आहे.  मावळातील कामशेत, कान्हे, शेलारवाडी, देहूरोड; तसेच शहरातील चिंचवड, आकुर्डी, अशा रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षा वार्‍यावरच असल्याचे दिसून येत आहे. या रेल्वे स्थानकांत आरपीएफ जवान अनुपस्थित असतात. त्यामुळे एखादा अनुचित प्रसंग घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

रेल्वेस्थानक परिसरात भरदिवसा मद्यपी झोपलेले असतात. तसेच अनेक वेळा टवाळखोर मुले या परिसरात बसलेले असतात. रात्रीच्या वेळेत येणार्‍या लोकल सेवेला महिलांची मोठी गर्दी असते.  या वेळेत टवाळखोरांची टोळकी येथे फिरत असतात. त्यामुळे येथून ये-जा करणार्‍या महिलांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

स्थानकांत भीतीदायक वातावरण 
रात्री 8 ते 9 च्या दरम्यान स्थानकावर टवाळखोर मुले , मद्यपी , भिकारी , चोरटे याचा वावर असतो. मात्र अशा वेळी लोणावळ्यातून प्रवास करुन देहूरोड स्थानकावर उतरायचं म्हटली की भीतीदायक वातावरण आणि काळोख पडलेला असतो. ह्या परिसरात देखील नागरिकांची वर्दळ कमी असते. त्यामुळे येथून ये-जा करताना महिलांना भीती वाटते; मात्र अशा वेळी या स्थानकांवर आरपीएफचे जवान हरवले कुठे, असा प्रश्न पडतो.

रेल्वेस्थानकांत  चालते स्टंटबाजी 
काहीवेळा रेल्वे स्थाकातील परिसरात तरुण मुले स्टंटबाजी करताना दिसतात. मात्र अशा स्टंटबाजामुळे दुसर्‍याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. 
                                                                                                                 -महिला प्रवासी. 

Latest Marathi News पिंपरी : रेल्वेस्थानकावरील आरपीएफ जवान हरवले कुठे? Brought to You By : Bharat Live News Media.