रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा साखरपुडा करणार?
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : विजय देवरकोंडा आणि ॲनिमल फेम रश्मिका मंदाना पुढील महिन्यात साखरपुडा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये खूप क्लोज बॉन्ड आहे. (Vijay Devarakonda-Rashmika Mandanna ) दोघांमधील मैत्रीदेखील सर्वश्रृत आहे. त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री सर्वांनाच माहिती आहे.
रश्मिकाने या साऊथ अभिनेत्याला केलं होतं डेट
रिपोर्टनुसार, रश्मिका मंदाना याआधी साऊथचा प्रसिद्ध स्टार रक्षित शेट्टीसोबत रिलेशनशीपमध्ये होती. अभिनेत्री रश्मिकाने त्याच्यासोबत साखरपुडादेखील केल्याचे म्हटले जात होते. पण, काही कारणांनी दोघांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही आणि दोघांचे ब्रेकअप झाले.
रश्मिकाचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ॲनिमल चांगलाच गाजला. तिने रणबीर कपूरसोबत चित्रपटात अभिनय केला होता. ॲनिमलने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.
संबंधित बातम्या –
Deadly Movie : टायगरसोबत झळकणार मिली फेम जान्हवी कपूर
‘मराठी रंगभूमी प्रगल्भ करण्यासाठी प्रयत्न करणार’ : डॉ. जब्बार पटेल
Mahatma Gandhi : महात्मा गांधी यांच्यावर चित्रपटसृष्टीने प्रचंड प्रेम केले : प्रकाश मगदूम
आता रिपोर्टनुसार, नेटकरी, त्यांचे फॅन्स त्यांच्या रिलोशनशीपबद्दल बोलत आहेत आणि दोघेही लवकरच साखरपुडा करतील, असे म्हटले जात आहे. (Vijay Devarakonda-Rashmika Mandanna)
Latest Marathi News रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा साखरपुडा करणार? Brought to You By : Bharat Live News Media.