भुसावळात दोन घरफोड्या; लोखो रुपयांची रोकड, सोने चोरीला
जळगाव : भुसावळ शहरातील श्रीहरी नगरातील बंद घर फोडून ९ लाख ९० हजारांची रोकड लांबवली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील श्रीहरी नगरात राहणारे मुकेशकुमार राधाकिशन कुमावत वय-४५ हे आपल्या परिवारासह बांधकाम मिस्तरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. रविवारी ७ जानेवारी रोजी दुपारी त्यांचे घर बंद होते, याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील बेडमध्ये ठेवलेले ९ लाख ९० हजारांची रोकड काढून चोरून नेले. हा प्रकार दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीला आला. मुकेशकुमार कुमावत यांनी तातडीने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात रात्री साडेनऊ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव हे करीत आहे.
पावणे सहा लाखाची घरफोडी
भुसावळ शहरातील खडक रोड पटेल कॉलनी मुख्य रस्त्यावर असलेल्या घरावर अज्ञात चोरट्यांनी घरात शिरुन पाच लाख 45 हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले. या प्रकरणी सोमवारी बाजारपेठ पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील खडका रोड पटेल कॉलनी गेटच्या बाजूला राहत असलेले इलियास मोहम्मद युनूस बागवान हे दि.7 रोजी गावाला गेलेले होते. त्याच रात्री साडेआठ वाजता त्यांच्या घराचे दरवाजे भावाला उघडे दिसल्याने त्याने घरात पाहणी केली असता घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दाग दागिने व रोख रक्कम असे एकूण पाच लाख 45 हजार रुपये घेऊन अज्ञात चोरटे पसार झाले. याप्रकरणी इंडिया बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पीएसआय हरीश भोये हे करीत आहे. बाजारपेठ हद्दीमध्ये भर दिवसा लागोपाठ घरफोडी झाली आहे यामुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. खडका रोड येथील घरात झालेले घरकुल म्हणजे पोलिसांना एक प्रकारे आव्हानच आहे. चारी बाजूने वस्ती आहे. दिवस रात्र या रस्त्यावर वाहतूक वर्दळ सुरू असते. तरीसुद्धा घरात चोरी झाल्याने पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिलेली आहे.
हेही वाचा :
Ram Mandir Inauguration: अभिमानास्पद! अयोध्येत दुमदुमणार नागपूरचे ‘शिवगर्जना’ ढोल-ताशा पथक
Weather Forecast | राज्यात पुन्हा अवकाळी! ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता
निरा-बारामती रस्त्यावरील प्रवास झाला सुखकर
Latest Marathi News भुसावळात दोन घरफोड्या; लोखो रुपयांची रोकड, सोने चोरीला Brought to You By : Bharat Live News Media.