अमरावती : अंगणवाडी सेविका आक्रमक, जि.प. समोर ठिय्या आंदोलन

अमरावती; पुढारी ऑनलाईन डेस्क : अमरावती जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या आहेत. बडतर्फच्या नोटीसा देऊनही जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका कामावर हजर झालेल्या नाहीत हे विशेष. अमरावती जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत चार अंगणवाडी सेविकांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. २५०० अंगणवाडी सेविकांना नोटीस दिल्या आहेत. आजपासून कामावर हजर न झाल्यास थेट सेवेतून … The post अमरावती : अंगणवाडी सेविका आक्रमक, जि.प. समोर ठिय्या आंदोलन appeared first on पुढारी.

अमरावती : अंगणवाडी सेविका आक्रमक, जि.प. समोर ठिय्या आंदोलन

अमरावती; Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अमरावती जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या आहेत. बडतर्फच्या नोटीसा देऊनही जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका कामावर हजर झालेल्या नाहीत हे विशेष. अमरावती जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे.
आतापर्यंत चार अंगणवाडी सेविकांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. २५०० अंगणवाडी सेविकांना नोटीस दिल्या आहेत. आजपासून कामावर हजर न झाल्यास थेट सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा जिल्हा परिषदने दिला होता. मात्र, या विरोधात जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविका आंदोलनाला बसल्या. सरकार विरोधात सेविकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अंगणवाडी सेविकांना दरमहा २६ हजार, आणि मदतनीसला २० हजार रुपये मानधन व कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी ४ डिसेंबरपासून जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस संपावर असल्याची माहिती अरुणा देशमुख, अंगणवाडी कर्मचारी युनियन, दिलीप उठाने, राज्य अध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी युनियन यांनी दिली आहे.
हेही वाचा : 

‘त्या’ लेकीचे बारसे घालणार कोण? कचर्‍यात सापडले अर्भक
खासदार राणा सहा महिन्यांत कारागृहात दिसतील : आंबेडकर
कापूस वेचण्याचे काम करत असताना वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

Latest Marathi News अमरावती : अंगणवाडी सेविका आक्रमक, जि.प. समोर ठिय्या आंदोलन Brought to You By : Bharat Live News Media.