Nagar : पाथर्डी पालिका इमारतीचे सुशोभीकरण नियमबाह्य

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  पाथर्डी नगरपालिकेच्या नवीन इमारतीचे बाहेरच्या बाजूचे सुशोभीकरणाचे सुमारे दीड कोटी रूपयांचे काम नियमबाह्य सुरू असल्याचा आरोप माजी नगरसेवक रमेश गोरे यांनी केला आहे. याप्रकरणी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात ते जिल्हाधिकार्‍यांना लेखी स्वरूपात तक्रार देणार आहेत. नगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या बाहेरील बाजूस कोट्यवधी … The post Nagar : पाथर्डी पालिका इमारतीचे सुशोभीकरण नियमबाह्य appeared first on पुढारी.

Nagar : पाथर्डी पालिका इमारतीचे सुशोभीकरण नियमबाह्य

पाथर्डी तालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा :  पाथर्डी नगरपालिकेच्या नवीन इमारतीचे बाहेरच्या बाजूचे सुशोभीकरणाचे सुमारे दीड कोटी रूपयांचे काम नियमबाह्य सुरू असल्याचा आरोप माजी नगरसेवक रमेश गोरे यांनी केला आहे. याप्रकरणी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात ते जिल्हाधिकार्‍यांना लेखी स्वरूपात तक्रार देणार आहेत.
नगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या बाहेरील बाजूस कोट्यवधी रूपये खर्चून करण्यात येत असलेले सुशोभीकरणाचे काम वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. सुमारे दीड कोटी रूपये खर्चाचे हे काम नियमबाह्यपणे सुरू असल्याचा आरोप गोरे यांच्याकडून करण्यात आला आहे. तर, हे काम नियमानुसार चालू असल्याचा खुलासा पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी केला आहे.
पाथर्डी शहरात अजंठा चौक येथील वीर सावरकर मैदानावर सध्या पालिकेच्या नवीन इमारतीचे काम चालू आहे. शहराच्या सौंदर्यात भर पाडणार्‍या या इमारतीच्या कामाचा लोकार्पण सोहळा पुढील महिन्यात होणे अपेक्षित आहे. सध्या इमारतीचे काम पूर्ण झाले असले तरी, ही इमारत बाहेरूनही सुंदर दिसावी, यासाठी दीड कोटी रूपये खर्चून सध्या अ‍ॅक्रोलिक पॅनेलिंग व काचेचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम निविदा प्रक्रिया पूर्ण न करताच सुरू करण्यात आल्याचा आरोप गोरे यांनी केला आहे. तर, लांडगे यांच्या म्हणण्यानुसार सध्या जे काम सुरू आहे, त्याचा ठेका या इमारतीचे काम करणार्‍या ठेकेदाराला दिला आहे. त्याने ज्या ठेकेदाराला हे काम दिले, तो ठेकेदार हे काम करत आहे. हे काम इमारतीच्या केवळ दीड बाजूचे आहे. तर, उर्वरित बाजूचे जे काम आहे, त्याचे टेंडर प्रसिद्ध केले असून, सोमवारी निविदा उघडण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित कामाला सुरवात केली जाणार आहे.
प्रत्यक्षात या ठिकाणी सुशोभीकरणाचे जे काम चालू आहे, ते जवळपास पन्नास टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सुद्धा चालू असल्याने नेमके काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. नगरपालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्याकडे प्रशासकीय कार्यभार आलेला आहे. नगरपालिका प्रशासकाच्या कार्यकाळातील अनेक विकासकामे हे वादाच्या भोवार्‍यात सापडली आहेत.
सध्या इमारतीचे सुरू असलेले कामाचा पूर्वीच्या ठेकेदाराला दिले होते. तर, उर्वरित कामाची निविदा सोमवारी उघडून पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
                                                             – संतोष लांडगे, मुख्याधिकारी.
या कामाचा कार्यारंभ आदेश निघालेला नसतानाही हे काम नियमबाह्यपणे चालू करण्यात आले आहे. या विषयी आपण तक्रार करणार आहोत.
                                                              – रमेश गोरे, माजी नगरसेवक
Latest Marathi News Nagar : पाथर्डी पालिका इमारतीचे सुशोभीकरण नियमबाह्य Brought to You By : Bharat Live News Media.